CLT20 : 10 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार बंद पडलेली चॅम्पियन टी-20 लीग? बीसीसीआयने कंबर कसली

Champions League T20 : फ्रेंचाईजी क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललीये, आयपीएलच्या सुरूवातीनंतर अनेक देशांनी आपल्या स्वदेशी टी20 लीग चालू केल्या आहेत. यामूळे आता 10 वर्षांपूर्वी बंद झालेली चॅम्पियन लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा विचारात बीसीसीआयसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी रूची दर्शवलेली आहे.

Updated: Apr 3, 2024, 06:24 PM IST
CLT20 : 10 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार बंद पडलेली चॅम्पियन टी-20 लीग? बीसीसीआयने कंबर कसली title=

Champions League T20 Tournament : क्रिकेटमध्ये होणारी चॅंपियन्स लीग टी20 टूर्नामेंट ही 2009 मध्ये सर्वात पहिले खेळवली गेली होती. या लिगची संकल्पना सर्वप्रथम 2008 साली अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डांशी चर्चा करून मांडली गेली, यानंतर बीसीसीआय (Board for cricket control in India), क्रिकेट ऑस्ट्रेलिया, तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपली आवड यामध्ये दाखवली. 2009 मध्ये या स्पर्धेचा श्रीगणेशा झाला होता, एकूण 10 संघांना या स्पर्धत सहभाग नोंदवून या लीगची शोभा वाढवली होती. पण 2014 मध्ये या लीगचे अस्तिस्व संपुष्टात आलं, पुरस्कर्त्यांची ऊणीव, लोकांचा लीगला मिळालेला कमी प्रतीसाद अशा बऱ्याच कारणांमुळे शेवटी या लीगला बंद करण्यात आलं. पण सध्याच्या काळात टी20 लीगची वाढती लोकप्रियता पाहून ही लीग पून्हा सुरू करण्याचा विचार अनेक क्रिकेट बोर्डांमध्ये सुरू आहे.

पुन्हा सुरू होणार CLT 20 स्पर्धा?

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या तीन देशांमध्ये, पुन्हा ही लिग सुरू करण्याबाबत चर्चा चालू आहे. कारण, आता प्रत्येक देशामध्ये आपली स्वतःची स्वतंत्र टी 20 लिग असल्यामुळे अनेक देशांच्या संघांना या लीगमध्ये खेळायला मिळणार आहे. याआधी 2014 मध्ये एकूण 10 संघांनी या लीगमध्ये सहभाग नोंदविला होता, यात आयपीएलचे तीन संघ, बिग बॅश लिग आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन संघ आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडमधील प्रत्येकी एक-एक संघांनी 2014 च्या सीएलटी 20 लिगमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.  आतापर्यंत CLT 20 लिगचे सहा सिझन खेळवले गेले आहेत, 2014 नंतर ही लीग बंद केली गेली.

क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ काय बोलले?

मेलबर्न क्रिकेटच्या मार्गदर्शनाखाली आणि खेलोमोरच्या पाठिंब्याने भारतात क्रिकेट अकॅडमी लाँच करण्यात आली, यावेळी क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिंस यांनी असं म्हटलंय की, 'आमचे, क्रिकेट ऑस्ट्रेलिया,  बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्याशी बोलणं सुरू असून, आम्ही सीएलटी 20 पुन्हा उदयास आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. क्रिकेट कॅलेंडरच्या अतिव्यस्त वेळापत्रकामधून थोडा कालावधी या लीगसाठी शोधणं फार कठीण काम आहे. यामुळे आम्ही सर्वात आधी महिला क्रिकेट मध्ये WPL, The Hundred आणि womens Big Bash यामधील संघांसोबत पहिली महिला चॅम्पियन्स लीग टी20 सुरू करण्याचा विचारात आहोत'

सध्या अनेक देशांमध्ये टी 20 क्रिकेट लिग खेळायला सुरवात झालेली आहेस जसं की, पाकिस्तानात पीएसएल, दक्षिण आफ्रिकेत SA20, श्रीलंकेत लंका प्रिमीयर लीग, यामुळे आता टी 20 लीगचा फॉरमॅट आणखीणच रंगतदार झालेला आहे. यामुळे क्रिकेट फॅन्सला पण भरपूर मनोरंजनाचा डोस मिळणार आणि यासोबतच मीडिया राईट्स व स्पॉन्सरशिप राईट्ससाठी पण अनेक मोठ्या कंपन्यांनी दाखवलेली आवड, यामुळे सीएलटी 20 आता परत कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आता असे प्रश्न निर्माण होताय की, काय असणार चॅम्पियन्स लीगचे भविष्य? क्रिकेट दर्शकांना आणखी किती वेळ या लीगची प्रतिक्षा करावी लागणार? पण या सर्वांचे उत्तर आपल्याला येणाऱ्या दिवसातच मिळणार, हे निश्चित...!