मुंबई : टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी खुशखबर आहे. परदेश दौऱ्यावेळी दिल्या जाणाऱ्या दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता खेळाडूंना परदेश दौऱ्यात दिवसाला २५० डॉलर (१७,७९९.३० रुपये) भत्ता मिळणार आहे. याआधी खेळाडूंना १२५ डॉलर (८.८९९.६५ रुपये) दिवसाला मिळत होते. हा भत्ता बिजनेस क्लास तिकीट, राहणे आणि लॉन्ड्री हा खर्च सोडून आहे, कारण हा खर्च बीसीसीआय करतं.
टीम इंडिया या वर्षी बहुतेक मॅच या भारतातच खेळणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजनंतर आता टेस्ट सीरिज खेळवली जाईल. यानंतर बांगलादेश भारत दौऱ्यावर येईल. डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा भारत दौरा नियोजित आहे. तर पुढच्या वर्षी सुरुवातीला झिम्बाब्वे आणि मग ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे.