Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेआधी भारताला मोठा झटका, 2 स्टार खेळाडू बाहेर

Commonwealth Games 2022 : भारतासाठी अतिशय वाईट बातमी आहे. भारताला मोठा झटका लागला आहे. 

Updated: Jul 20, 2022, 08:02 PM IST
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेआधी भारताला मोठा झटका, 2 स्टार खेळाडू बाहेर title=

मुंबई : भारतासाठी अतिशय वाईट बातमी आहे. भारताला मोठा झटका लागला आहे. अव्वल धावपटू एस धनलक्ष्मी डोप चाचणीत अयशस्वी झाल्याने आगामी राष्ट्रकुल खेळांना मुकणार आहे. तसेच तिहेरी उडीमध्ये नॅशनल रेकॉर्ड असणारा ऐश्वर्य बाबू देखील प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. (commonwealth games 2022 s Dhanalakshmi and aishwarya babu fail dope test) 

भारताला मोठा झटका 

धनलक्ष्मी कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या  भारताच्या 36 जणांच्या ग्रृपमध्ये आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या चाचणीत ती बंदी घातलेले स्टिरॉइड्स वापरल्याबद्दल दोषी आढळली. "एआययूने केलेल्या डोप चाचणीत धनलक्ष्मी पॉझिटिव्ह आढळली आहे. ती बर्मिंगहॅम गेम्समध्ये खेळणार नाही", अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.