कंडोम कंपनीने विराट-अनुष्काला दिल्या अशा शुभेच्छा, सगळेच झाले हैराण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह इटलीमध्ये पाप पडला आणि अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 13, 2017, 10:17 AM IST
कंडोम कंपनीने विराट-अनुष्काला दिल्या अशा शुभेच्छा, सगळेच झाले हैराण title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह इटलीमध्ये पाप पडला आणि अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

शुभेच्छाचा पाऊस

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांसाठी हे लग्न खूप स्पेशल होतं. अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये कंडोम ब्रँड ड्यूरेक्सचा देखील समावेश आहे. ज्यांनी ट्विटरवर अशी शुभेच्छा दिली ज्यानंतर सगळेच हैराण झाले.

अनोख्या शुभेच्छा

ड्यूरेक्स इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन विराट आणि अनुष्काला विवाहाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अशी शुभेच्छा पाहून अनेकांना धक्का बसला. ड्यूरेक्स इंडियाने असं ट्विट केलं की, शेवटी विराट कोहलीने आपली मेडन ओव्हर टाकली. VirushkaKiShadi।. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'अभिनंदन अनुष्का आणि विराट. तुमच्या दोघांमध्ये अजून कोणीच येऊ नये शिवाय ड्यूरेक्सच्या.'

कंपनीचं हे ट्विट त्यानंतर आलं जेव्हा सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने हे आदेश दिले की, कंडोमची अॅड सकाळी ६ ते रात्री १० च्या मध्ये दाखवली जावू नये.'