मुंबई : भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शेती हे नातं अनोखं आहे. अनेकदा अजिंक्य राहणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याचं आपण पाहिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेनेही महाराष्ट्र राज्य सरकारला १० लाखांची मदत जाहीर केली होती. आता अजिंक्यने तुळजापूरच्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांच कौतुक केलं आहे.
या शेतकऱ्याने आपल्या केळीच्या शेतातील केळी गरीबांना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओतून शेतकऱ्याने आपल्याकडे २ एकर जमिनीत केळीची बाग आहे. यामधलं सगळं पीक हे आता काढणीसाठी आलं आहे. सरकारने माझ्या शेतातील केळी गरीबांसाठी घेऊन जावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मी गरीब शेतकरी मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण मी अशी मदत नक्कीच करू इच्छितो असं म्हणतं त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ अजिंक्य रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
It’s not about what you have, it’s about what you give!
A noble gesture by this farmer from Tuljapur who is willing to offer his produce to the needy during this difficult period. #IndiaFightsCorona
pic.twitter.com/k5Une4tbKE— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 2, 2020
अजिंक्यने हा व्हिडिओ शेअर केला. याला खूप चांगला प्रतिसाद मिळला आहे. अजिंक्यसोबतच अनेक खेळाडूंनी मदत जाहिर केली आहे. गौतम गंभीरने खासदार निधीतून १ कोटीची मदत जाहीर केली असून दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे ५० व ५२ लाखांचा निधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.