लाईव्ह मॅच दरम्यान त्यांनी एकमेकांना केलं KISS

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या मॅच दरम्यान असा काही प्रकार घडला की संपूर्ण स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 10, 2017, 08:15 PM IST
लाईव्ह मॅच दरम्यान त्यांनी एकमेकांना केलं KISS title=
Image: Facebook

नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या मॅच दरम्यान असा काही प्रकार घडला की संपूर्ण स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं.

ही मॅच इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकत सिरीज आपल्या नावावर केली. मात्र, या दरम्यान अशी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली जी सर्वांच्याच लक्षात राहील.

या मॅचमध्ये इंग्लंडच्या जेम्स अॅँडरसनने आपल्या टेस्ट करिअरमध्ये ५०० विकेट्स पूर्ण केले. अँडरसनने केलेल्या या रेकॉर्डसाठी संपूर्ण स्टेडिअम त्याचं कौतुक करण्यासाठी उभं राहीलं. मात्र, त्याचवेळेस प्रेक्षकांमधील एक तरुण उभा राहीला आणि त्याने आपल्याकडील रिंग गर्लफ्रेंडला देत प्रपोज केलं.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओत दिसत आहे की, तो तरुण प्रपोज करत आहे. त्या मुलीला पहिल्यांदा धक्का बसला मात्र, नंतर तीने भावूक होत प्रपोजल स्विकालं. मग दोघांनीही स्टेडिअममध्येच एकमेकांना किस केलं.

हा रोमॅन्टिक प्रपोजल पाहून संपूर्ण वातावरणच बदललं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं.