थैमान सुरुच! कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू

Corona virus कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत आहे. 

Updated: Mar 17, 2020, 10:29 AM IST
थैमान सुरुच! कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू  title=
संग्रहित छायाचित्र

मद्रिद : Corona virus कोरोना व्हायरस साऱ्या जगभरात थैमाच घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. चीन, इराण, इटलीमागोमाग स्पेनमध्येही कोरोनाचा विळखा वाढतच आहे. या सर्व चर्चांमध्ये आता एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

स्पॅनिश फुटबॉल कोच फ्रान्सिस्को ग्रासिया याचा वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. 

अटलेटीको पोर्टादा अल्टा या युवा संघाच्या व्यवस्थापकपदी तो २०१६पासून कार्यरत होता. सध्याच्या घडीला स्पेनमध्ये कोरोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱ्यांमध्ये फ्रान्सिसिको सर्वाधिक तरुण बाधित ठरला असल्याची माहिती 'गोल'ने प्रसिद्ध केलं आहे. 

अटलेटीको पोर्टादा अल्टाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरन याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली. ग्रासियाच्या जाण्याने फुटबॉल जगतासोबतच अनेकांनाच हादरा बसला आहे. 

'आमचे कोच फ्रान्सिस्को ग्रासिया आकस्मित निधनाने सर्वांनाच दु:ख झालं आहे. या घडीला त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यासमवेत आम्ही आहोतच', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं. 'आता आम्ही तुझ्याशिवाय काय करणार फ्रान्सिस? तू पोर्टादाची कायमच साथ दिलीस. जेव्हा गरज लागली तेव्हा तू आमच्यासोबत होतास', अशा अत्यंत भावनिक ओळी लिहित तुझ्यासाठी संघाची कामगिरी सुरुच राहिल असा विश्वास या कोचला देण्यात आला. आम्ही तुला कधीच विसरणार नाही, अशा हृदयद्रावक पोस्टने संघाच्या वतीने या २१ वर्षीय कोचला श्रद्धांजली वाहण्यात आली. 

मागील आठवड्यामध्ये कोविड१९ची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक रुग्णालयात फ्रान्सिस्कोला दाखल करण्यात आलं होतं. रविवारी अखेर त्याचा मृत्यू झाला. कोरोनासोबतच त्याल्या Leukemiaचीही लागण झाल्याची बाब समोर आली होती. 


छाया सौजन्य- एएनआय 

दरम्यान, स्पेनमध्ये कोरोनाचा वाढता विळखा पाहता स्पॅनिश फुटबॉल लीग स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. फ्रान्स, युके आणि इटलीमध्येही अशीच पावलं उचलली गेली आहेत. 'ला लिगा', 'प्रिमीयर लीग', 'चॅम्पियन्स लीग' आणि 'सेरी ए' अशा स्पर्था फुटबॉल तूर्तास रद्द केल्या गेल्या आहेत.