Latest ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात टीम इंडियाच्या (Team India) युवा फलंदाजांचा जलवा पाहायला मिळालाय. श्रीलंकाविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. या मालिकाविजयामुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking) मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिलला आयसीसी टी20 क्रमवारीत जबरदस्त फायदा झालाय. तर कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जो रूटने (Joe Root)अव्वल स्थान गाठलं आहे. रुटने वेस्टइंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 291 धावा केल्या होत्या.
भारताच्या युवा खेळाडूंचा जलवा
टीम इंडियाने टी20 मालिकेत श्रीलंकेत क्लीन स्वीप दिला. या मालिकेत यशस्वी जयस्वालने 3 सामन्यात 177 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला असून जयस्वालने सहव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर शुभमन गिलने चक्क 16 स्थानांची झेप घेत क्रिकेट कारकिर्दीतलं सर्वोत्तम स्थान गाठलं आहे. गिल टी20 क्रमवारीत 21 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.
टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वाल तर चौथ्या तर ऋतुराज गायकवाड आठव्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये जो रुट अव्वल
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने पुन्हा एकदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. रुटने नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1 शतक आणि 2 अर्धशतकं करत 291 धावा केल्या. याच कामगिरीच्या जोरावर रुटने केन विल्यमन्सला मागे टाकलं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला एका स्थानाचा फायदा झाला. बाबर आझम कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. पण पहिल्या पाचमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. कर्णधार रोहित शर्मा सहाव्या, यशस्वी जयस्वाल आठव्या तर विराट कोहली 10 व्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रमवारी
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान क्रिकेट संघचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. दुसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
69/1(18.4 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.