ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, शुभमन गिलची बादशाहत संपली

ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर वन असणाऱ्या शुभमन गिलची घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पॉईंटही कमा झाले आहेत. 

राजीव कासले | Updated: Dec 20, 2023, 06:29 PM IST
ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, शुभमन गिलची बादशाहत संपली title=

ICC ODI Rankings Babar Azam Number 1 : आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान आयसीसी क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल स्थानावर असणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) घसरण झाली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पुन्हा एकदा नंबर वनच्या खुर्चीवर बसला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर शुभमन गिल एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तर बाबर आझमही एकदिवसीय क्रिकेटपासून दूर आहे. 

बाबर आझमची बादशाहत
आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यात बाबर आझम नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबर आझमच्या खात्यात 824 पॉईंट आहेत. पण शुभमन गिलच्या पॉईंटमध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात शुभमन गिलची रेटिंग 826 इतकी होती. त्यात घसरण होऊन आता 810 झाली आहे. त्यामुळे शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विश्वचषकानंतर पाकिस्तान संघ एकही एकदिवसीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे बाबर आझमच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीत. तर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन एकदिवसीय सामने खेळला आहे. पण एकदिवसीय संघात शुभमन गिलला संधी देण्यात आली नव्हती.

पण संघ खेळत असले आणि त्यात एखादा खेळाडू खेळत नसेल तर त्याचे पॉईंट आपोआप कमी होतात. हेच कारण आहे की ज्यामुळे शुभमन गिलची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. शुभमन गिल दोन पॉईंटने पुढे होता आता तो बाबर आझमपेक्षा 14 पॉईंटने पिछाडीवर आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शुभमन गिल खेळणार नाहीए, त्यामुळे त्याच्या रेटिंग पॉईंटमध्ये आणखी घसरण होऊ शकते.

रोहित-विराट आपल्या स्थानावर कायम
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रेटिंग पॉईंटमध्ये घसरण झाली आहे. पण विराट कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. विराट कोहलीच्या खात्यात  791 पॉईंट होते, आता 775 पॉईंट झाले आह. तर रोहित शर्माचे 769 पॉईंट होते, त्यात घसरण होऊन 754 पॉईंट झाले आहेत. डेव्हिड वॉर्नर 745  पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

मलान, क्लासेने टॉप 10 मध्ये
न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेरिल मिचेल 743 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर तर आयर्लंडचा फलंदाज हॅरी टॅक्टर सातव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॉसी वान डर डुसेच्या पॉईंटमध्ये घसरण झाली आहे. रॉसी वान डर डुसेचे आधी 735 पॉईंट होते, आता ते 717 झाले आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान 707 पॉईंटसह नवव्या तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिस क्लासने 705 पॉईंटसह दहाव्या क्रमांकावर आहे.