Rohit Sharma T20 : टीम इंडियासाठी टी20 क्रिकेटमध्ये 14 महिन्यानंतर खेळणाऱ्या रोहित शर्मासाठी पुनरागमन एका वाईट स्वप्नासारखं ठरलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच षटकात शुन्यावर रनआऊट झाला. शुभमनल गिलच्या (Shubman Gill) बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला. बाद झाल्यानंतर संतापलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma Angry) भर मैदानातच शुभमन गिलला फटकारलं. इतकंच नाही तर त्याला शिवागाळही केली.
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन समन्यांच्या टी20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना पंजाबच्या मोहाली स्टेडिअममध्ये खेळला जातोय. टीम इंडियाचा कर्णझार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने निर्धारित पन्नास षटकात पाच विकेट गमावत 158 धावा केल्या. विजयाचं आव्हान समोर ठेऊन टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. खरंतर शुभमन गिलऐवजी यशस्वी जयस्वाल सलामीला येण्याची शक्यता होती. सामन्याच्या एकदिवस आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत तसे संकेतही दिले होते. पण दुखापतीमुळे यशस्वी खेळू शकला नाही आणि त्याच्या जागी शुभमन गिलला संघात सलामीला संधी मिळाली.
रोहितचं पुनरागमन फसलं
पण सामन्याच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शुभमन गिलकडून मोठी चूक झाली. या चुकीमुळे शुभमन गिलवर चांगलीच टीका होऊ लागली आहे. रोहित शर्माने पुढे येत मिड ऑफवर फटका लगावला आणि तो धाव घेण्यासाठी धावत सुटला. पण अफगाणिस्तानच्या फिल्डरने उडी मारत चेंडू अडवला. रोहित धाव घेण्यासाठी दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला. पण शुभमन गिलचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं तो चेंडू पाहात दोन पावलं पुढे गेला आणि पुन्हा क्रिजमध्ये आला.
रोहित धाव घेण्यासाठी ओरडत होता, पण शुभमन गिलने आपली जागा सोडलीच नाही. तिकडे फिल्डरने विकेटकिपरकडे चेंडू फेकला आणि रोहित शर्मा रनआऊट झाला. यानंतर रोहित शर्माचं स्वत: वरचं नियंत्रण सुटलं. भर मैदानात त्याने शुभमन गिलला चांगलंच फटकारलं. गिलने त्याची समजूत काढण्याचा प्रयतन केला. पण रोहित ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने गिलला शिवीगाळही केली. अवघ्या दोन चेंडूत रोहित शर्माचं पुनरागमन फसलं.
Rohit gone for duck #RohitSharma #Gill #IndvsAfg #INDvAFG pic.twitter.com/xpSGnreCm5
— Shubham Chand (@shubhamchand768) January 11, 2024
शुभमन गिलकडून चूक
रोहित शर्माच्या बाद होण्यात पूर्णपणे शुभमन गिलची चूक असल्याचं सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटलंय. रोहितने फटका मारत धाव घेण्यासाठी पुढे आला पण शुभमन गिलने रोहितकडे पाहिलंही नाही. पूर्णवेळ तो चेंडूकडे पाहात राहिला. रोहित दुसऱ्या टोकाला पोहोचला तरी शुभमन गिलने आपली जागा सोडली नाही. आपली चूक असतानाही गिलने कर्णधारासाठी आपली विकेट टाकली नाही.
रोहित बाद झाल्यानंर गिलसुद्ध मैदानावर फार काळ टिकला नाही. 12 चेंडूत 23 धावा करत तो बाद झाला.