बीसीसीआयने केली घोषणा! भारत-इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका.. पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ind vs Eng Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची अधिकृत घोषणा केली आहे.   

राजीव कासले | Updated: Aug 22, 2024, 06:32 PM IST
बीसीसीआयने केली घोषणा! भारत-इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका.. पाहा संपूर्ण वेळापत्रक title=

India vs England Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) याची अधिकृत घोषणा केली आहे.  यानुसार टीम इंडिया  (Team India) पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीने हा दौरा टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा हंगाम
2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी सध्या सर्व संघांचे प्रयत्न सुरु आहेत. यानंतर 2025 ते 2027 दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा हंगाम सुरु होईल. सध्याच्या WTC पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टॉप-2 मध्ये आहेत. पहिल्या स्थानावर टीम इंडिया तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. या दोन्ही संघात याचवर्षी 5 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. 

भारत-इंग्लंड कसोटी मालिका
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 20 जूनला खेळवण्यात येईल. वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या हेडिंग्लेमध्ये हा सामना रंगेल. तर दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलैदरम्यान बर्मिंघमच्य एजबेस्टन मैदानावर रंगणार आहे. तिसरा कोसाटी सामना 10-14 जुलैदरम्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळवला जाईल. तर 23-27 जुलैदरम्यान मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना पार पडेल. मालिकेतला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओव्हलमध्ये 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान खेळवला जाईल. 

विश्रांतीसाठी बराच वेळ
या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन कसोटीच्या मध्ये विश्रांतीसाठी बराच वेळ देण्यात आलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीमध्ये एक आठवड्याची विश्रांती मिळणार आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान आठ दिवसांची विश्रांती मिळणार आहे. खेळाडूंना पुरेसा आराम आणि दुखापतीतून सावरण्यासाठी हा वेळ उपयोगी ठरणार आहे. 

2007 पासून विजयाच्या प्रतीक्षेत
टीम इंडिया 2007 म्हणजे गेल्या सतरा वर्षांपासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 2021 मध्ये टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ आली होती. पण ही मालिका 2-2 अशी अनिर्णित राहिली. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. भारताने ही मालिका 4-1 अशी जिंकली होती. या मालिकेत यशस्वी जयस्वाल स्टार ठरला होता. त्याने द्विशतकासह या मालिकेत 700 धावा केल्या होत्या. ही मालिका भारतात खेळवण्यात आली होती.