Rohit Sharma : पाकिस्तानी चाहत्याने सेल्फी घेताना केले असे कृत्य, रोहित म्हणाला हाथ तर सोड यार

 India vs Pakistan Rohit Sharma: एशिया चषक-2022 च्या (Asia Cup-2022) ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला होता, पण सुपर-4 सामन्यात टीम इंडियाची निराशा झाली.  

Updated: Sep 6, 2022, 09:15 AM IST
Rohit Sharma : पाकिस्तानी चाहत्याने सेल्फी घेताना केले असे कृत्य, रोहित म्हणाला हाथ तर सोड यार title=

दुबई : India vs Pakistan Rohit Sharma: एशिया चषक-2022 च्या (Asia Cup-2022) ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला होता, पण सुपर-4 सामन्यात टीम इंडियाची निराशा झाली. पाकिस्तानने भारताचा एका चेंडूवर 5 विकेट राखून पराभव केला. भारतासाठी या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगला खेळ केला. मात्र गोलंदाजांमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तानी खेळाडूंसोबत सेल्फी काढले. 

चाहत्यांनी सेल्फी घेतला 

भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर तो बसमध्ये बसणार होता. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला ऑटोग्राफ आणि सेल्फी घेण्याची विनंती केली. यावर रोहित शर्माने चाहत्यांची इच्छा पूर्ण करत चाहत्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांना ऑटोग्राफही दिला. यादरम्यान एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्यासोबत असे केले, ज्यावर रोहित शर्मा आणि उपस्थित सर्व लोक हसले. 

पाकिस्तानी चाहत्यांनी हात धरला 

कर्णधार रोहित शर्मा चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासोबतच त्यांच्याशी हस्तांदोलन करत होता. यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने सेल्फी घेताना त्याचा हात पकडला. जेव्हा तो बराच वेळ रोहित शर्माचा हात धरुन होता. तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, अरे हात सोड, एवढेच बोलून उपस्थित सर्व लोक हसले. 

भारतीय संघ हरला 

प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानी संघाला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. रोहित शर्मा आणि के. एल. राहुलने टीम इंडियाला झंझावाती सुरुवात करुन दिली. यानंतर विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे सामना टीम इंडियाच्या हातातून निसटला. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी अनेक धावा लुटल्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना ५ विकेटने जिंकला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चहल यांनी 1-1 बळी घेतला.