Virat Kohli World Record : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) शतक झळकावत विराट कोहलीने (Virat Kohli) धावांचा दुष्काळ संपवला. तब्बल 1020 दिवसांनी विराट कोहलीने शतक झळकावलं. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे 71 वं शतक होतं (international cricket career of virat kohli), याबरोबरच सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. मैदानावर रेकॉर्ड करणाऱ्या विराटच्या नावावर आता मैदानाबाहेरही एक रेकॉर्ड जमा झाला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
विराट कोहली क्रिकेटबरोबरच सोशल मीडियावरही (Social Media) नेहमीच चर्चेत असतो. आता सोशल मीडियावरही त्याच्या नावे मोठा रेकॉर्ड जमा झाला आहे. विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सची (Twitter Account Followers) संख्या तब्बल 50 मिलिअन (50 Millions) इतकी झाली आहे. विराट कोहली जगातला पहिला क्रिकेटपटू आहे ज्याची फॉलोअर्स संख्या 50 मिलिअन आहे. याबरोबरच विराट कोहलीचं ट्विटर अकाऊंट सर्वात जास्त फॉलोअर्स असलेलं भारतातलं तिसरं अकाऊंट बनलं आहे. पहिल्या दोनमध्ये पीएओ ऑफिशियल ट्विटर अकाऊंट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं ट्विटर अकाऊंट आहे.
इंस्टाग्रामवरही रेकॉर्ड
विराट कोहली इन्स्टाग्रामवरही (Instagram) किंग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 211 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर 200 मिलिअन फॉलोअर्स असणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. विराटच्या आसपासही इतके मिलिअन असणारा एकही भारतीय नाही. गेल्या वर्षीच विराटने 100 मिलिअनचा आकडा पार केला होता.
सोशल मीडियावर रेकॉर्डचा बादशहा
विराट कोहलीने इन्स्टग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत जगातल्या दिग्गज व्यक्तींनाही मागे टाकलं आहे. विराटच्या पुढे आता केवळ चार जण आहेत. यात सर्वात पहिल्या स्थानावर प्रसिद्ध फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (476 मिलियन), काइली जेनर (366 मिलियन), सेलेना गोम्स आणि ड्वेन जॉनसन(334 मिलिअन).