आयपीएल आधी वृद्धिमान साहा याचा धमाका, २० चेंडूत शतक

टीम इंडियाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने आयपीएल सुरु होण्याआधीच स्फोटक फटकेबाजी केली.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2018, 07:25 PM IST
आयपीएल आधी वृद्धिमान साहा याचा धमाका, २० चेंडूत शतक title=

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने आयपीएल सुरु होण्याआधीच स्फोटक फटकेबाजी केली. कोलकातामधील एका क्लब सामन्यात खेळताना २० चेंडूत शानदार शतक ठोकले. हे शतक करताना आयपीएलमध्ये काय रणनिती असेल, त्याची चुणूक दाखवून दिलेय. कोलकाता कालीघाटमध्ये जेसी मुखर्जी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये मोहन बागान आणि बीएनआर रिक्रिएशन क्लबमध्ये हा सामना झाला. 

२० बॉलमध्ये १०२ धावा

वृद्धिमान साहा हा मोहन बागान टीमकडून खेळत आहे. बुधवारी मोहन बागानविरुद्ध बीएनआर रिक्रिएशन क्लबच्या टीमने ७ बाद १५१ धावा केल्यात. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मोहन बागानकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वृद्धिमान साहाने जोरदार फटकेबाजी केली. साहासोबत शुभोमोय दास यांनेही चांगली फटकेबाजी केली. या जोडीने ७ षटकात १५१ धावा कुटल्यात. वृद्धिमान साहाने केवळ २० बॉलमध्ये १०२ धावा केल्या. या धावांच्या जोरावर संघाने १० गडी राखून विजय मिळवला.

 ४ चौकार आणि १४ षटकार 

वृद्धिमान साहाने १०२ धावा फटकावताना ४ चौकार आणि १४ षटकार ठोकलेत. त्याने ५१० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. तर शुभोमोय दासने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि २ उत्तुग षटकार खेचलत. या दोघांनी ७ षटकात सामना संपवला.

IPL से पहले ऋद्धिमान साहा का धमाका, 20 बॉल में जड़ दिया शतक

वृद्धिमान साहा हा अकाव्या सीजनमध्ये हैदराबाद सनराइजर्सडून खरेदी करण्यात आलेय. त्याला ५ कोटींची बोली लागलेय. ३३ वर्षीय हा खेळाडू हा टीम इंडियाकडून खेळताना त्याने दक्षिण आफ्रीका दौऱ्यात चांगली कामगिरी केली.