IPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 3, 2023, 01:57 PM IST
IPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा title=

Arjun Tendulkar : आयपीएलचा सोळावा (IPL 2023) हंगाम गाजवला तो युवा क्रिकेटपटूंनी. यशस्वी जयस्वाल, रिंकू शर्मा, साई सुदर्शन, तिलक वर्मा, सुयश शर्मा या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने आयपीएलवर छाप उमटवली. पण त्याचबरोबर टीम इंडियाचा दरवाजाही ठोठावला आहे. याच आयपीएलमधून सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अर्जुन तेंडलकरनंही (Arjun Tendulkar) मैदानावर पाऊल टाकलं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला केवळ चार सामने खेळता आले, पण संपूर्ण स्पर्धेत तो प्रकाशझोतात राहिला.

अर्जुनला टीम इंडियात संधी?
आयपीएलमध्ये मोठी संधी मिळाली नसली तरी अर्जुनने रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. आणि आता लवकरच त्याला टीम इंडियातही (Team India) संधी मिळू शकते. सूत्रांकडू मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन तेंडुलकरला इंडिया-ए (India-A) संघात संधी मिळू शकते. गोवा क्रिकेट संघाचा मोहित रेडकर आणि अर्जुन तेंडुलकर बंगलोरमध्ये होणाऱ्या क्रिकेट शिबिरासाठी निवडल्याची माहिती आहे. बीसीआयच्यावतीने (BCCI) उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी शिबिराचं आयोजन केलं जातं. या शिबिरासाठी अर्जुनची निवड झाली आहे. 

या शिबिरात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना इंडिया-ए संघात एन्ट्री करण्याची चांगली संधी असते. म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने शिबिरात चांगली कामगिरी केली तर त्याला इंडिया-ए संघात संधी मिळू शकते. 

आयपीएलमध्ये मिळाली संधी
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडिन्सचा खेळाडू आहे. 2021 मध्ये अर्जुनला मुंबईने आपल्या संघात घेतलं. पण पहिल्या दोन हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण अखेर तिसऱ्या हंगामात कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास टाकला आणि पहिल्यांदा तो मैदानात उतरला. आयपीएल 2023 मध्ये अर्जुन 4 सामने खेळला. यात त्याने 3 विकेट घेतल्या. सनरायजर्स हैदराबादच्या भूवनेश्वर कुमारला बाद करत अर्जुनने आयपीएलमधली पहिली विकेट घेतली. फलंदाजीत त्याला एकदाच संधी मिळाली. यात त्याने 13 धावा केल्या.

रणजी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
अर्जुन तेंडुलकरसाठी या वर्षाची सुरुवात दमदार राहिलीय. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने दमदार शतक ठोकलं. फर्स्ट क्लास क्रिकेट सामनयात अर्जुनने आतापर्यंत 7 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. तर 233 धावा केल्या आहेत. तर लिस्ट A सामन्यात 8 विकेट आणि 25 धावा त्याच्या नावावर आहेत.