एबी डिव्हिलअर्सने निवडले ODIचे ऑलटाईम फेव्हरेट 3 ओपनर्स, तिसरं नाव वाचून भारतीयांना वाटेल अभिमान

Ab devillers All Time Favourate top 3 ODI Openers : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील ऑल टाईम फेव्हरेट टॉप तीन फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे तीनपैकी दोन भारतीय फलंदाज आहेत.   

राजीव कासले | Updated: Oct 14, 2024, 06:00 PM IST
 एबी डिव्हिलअर्सने निवडले ODIचे ऑलटाईम फेव्हरेट 3 ओपनर्स, तिसरं नाव वाचून भारतीयांना वाटेल अभिमान title=

Ab devillers All Time Favourate top 3 ODI Openers : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने (Ab Devillers) एकदिवसीय क्रिकेटमधील ऑल टाईम फेव्हरेट टॉप तीन फलंदाजांची निवड केली आहे. आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना डिव्हिलिअर्सने आपल्या फेव्हरेट तीन फलंदाजांची नावं सांगितली. या क्रिकेट चाहत्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुझ्या आवडीचे टॉप तीन सलामीचे फलंदाज कोणते असतील? असा प्रश्न विचारला. यावर विचार करुन डिव्हिलिअर्सने तीन फलंदाजांची नावं घेतली. विशेष म्हणजे तीनपैकी दोन भारतीय फलंदाज आहेत.

ODIचे ऑलटाईम फेव्हरेट टॉप 3 खेळाडू

डिव्हिलिअर्सने ODIच्या ऑलटाईम फेव्हरेट टॉप 3 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनला (Matthew Hayden) पहिल्या क्रमांकासाठी निवडलं आहे. हेडन ज्या पद्धतीने फलंदाजी करायचे ते मला खूप आवडायचं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हेडनसारखा धोकदायक सलामीवीर सापडणार नाही. वेगवाग असो की फिरकी गोलंदाज असू हेडन तितकीच आक्रमक फलंदाजी करायचा असं डिव्हिलिअर्सने म्हटलंय.

एबीने आपल्या फेव्हरेट फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) स्थान दिलं हे. विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्यात बरंच क्रिकेट बाकी आहे. आयपीएल आणि टी20 क्रिकेटमध्ये तो ओपनिंग करायचा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना त्याला पाहायचं आहे, असंही डिव्हिलिअर्सने म्हटलंय. विराट कोहली जोपर्यंत क्रिकेट खेळेल तोपर्यंत तो या खेळाला खूप काही देईल असंही डिव्हिलिअर्सने म्हटलंय.

नव्या पिढितल्या फलंदाजांची निवड करायचं झाल्यास टीम इंडियाचा मिस्टरर 360 अर्थात सूर्यकुमारची निवड योग ठरेल, असं सांगत डिव्हिलिअरने एकदिवसीय ऑल टाईम फेव्हरेट यादीत सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जागा दिली आहे. सूर्यकुमार हा जागतिक क्रिकेटमधला जादूगर आहे. त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे शॉट्स आहेत. सूर्यकुमारची फलंदाजी बघत राहावं असं डिव्हिलिअर्सने म्हटलं आहे.

डिव्हिलिअर्सची क्रिकेट कारकिर्द एबी डिव्हिलिअर्स हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दित त्याने अनेक विक्रम रचले. 114 कसोटी सामन्यात डिव्हिलिअर्सने 8765 धावा केल्या असून तब्बल 22 शतकं त्याच्या नावावर आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये डिव्हिलिअर्सने 228 सामनयात 9577 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डिव्हिलिअर्सच्या नावावर 25 शतकं जमा आहेत. तर 78 टी20 सामन्यात डिव्हिलर्सने 1237 धावा केल्यात.