मुंबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन उड्डाण केलं. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हैंडलवरुन पोस्ट देखील केली आहे. एयरपोर्टवर फ्लाइटची वाट बघत असताना भारतीय दोन खेळाडू एकमेकांना भिडले. घाबरण्याचं काही कारण नाही, हा एक व्हिडीओ गेम खेळताना केलेली गंमत आहे.
एअरपोर्टवर फ्लाइटची वाट पाहताना, मनीष पांडे आणि क्रुणाल पांड्या एक गेम खेळताना दिसले. यात दोघांत सामना चालू होता. टीम इंडियातील खेळाडू विरंगुळा म्हणून नेहमी अशा प्रकारचे गेम खेळताना दिसतात. धोनी असो नाहीतर विराट, सिनीअर ते ज्युनिअर सर्व खेळाडूंना व्हिडीओ गेमची आवड आहे, असे देखील म्हटले जातंय, टीम इंडियाचा सध्याचा फेवरेट गेम पबजी आहे.
Happy faces and gamer boys before the team's departure to Australia #TeamIndia pic.twitter.com/eZCgdrABCE
— BCCI (@BCCI) November 16, 2018
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ३ एकदिवसीय, टी-२०, ४ कसोटी सामने खेळले जाणार आहे. यात टी-20 मालिकेतील पहिला सामना २१ नोव्हेंबरला गाबामध्ये खेळला जाईल. दुसरा टी-20 सामना २३ नोव्हेंबरला एमसीजी येथे होणार आहे. तिसरा टी-20 सामना २५ नोव्हेंबरला एमसीजी येथे रंगणार आहे.
टेस्ट सिरीज- ६ पहिला सामना डिसेंबरला एडिलेडमध्ये खेळला जाईल. १४ डिसेंबरला दुसरा सामना पर्थ येथे होणार आहे. तिसरा सामना २६ डिसेंबरला एमसीजी येथे खेळला जाणार आहे.
१२ जानेवारीला एमसीजी येथे पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. १५ जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना ओवल येथे होणार. तिसरा एकदिवसीय सामना १८ जानेवारीला मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.