रोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा

Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 5, 2024, 06:30 PM IST
रोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा title=

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघा आता अफगाणिस्तान संघाविरुद्ध (India vs Afghanistan) दोन हात करण्यासाठी सज्ज झालीय. टीम इंडिया (Team India) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series) खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ही मालिका टीम इंडियाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करणार आहे. अफगाणिस्ताविरुद्धची टी20 मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर आणि शिवसुंदर दार आणि सलिल अंकोला हे निवडकर्ते सध्या केपटाऊनमध्ये आहेत. 

रोहित-विराटचं कमबॅक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 2022 टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. आता अफगाणिस्तान टी20 मालिकेत त्यांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्टइंडिजनमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. रोहित शर्माचं पुनरागमन म्हणजे त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 विश्वचषक खेळणार आहे. 

हार्दिक-सूर्या बाहेर
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि मिस्टर 360 सूर्यसुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे अफगाणिस्ताविरुद्धच्या टी20 मालिकेसाटी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी विजयात बुमराह आणि सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना उतरवण्यात येईल. 

भारत-अफगाणिस्तान टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहला टी20 सामना : 11 जानेवारी, मोहाली
दूसरा टी20 सामना : 14 जानेवारी, इंदौर
तीसरा टी20 सामना : 17 जानेवारी, बंगळुरु

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 25-29 जानेवारी, हैदराबाद
दुसरा कसोटी सामना : 2-6 जानेवारी, विशाखापट्टनम 
तिसरा कसोटी सामना : 15-19 जानेवारी, राजकोट
चौथा कसोटी सामना : 23-27 जानेवारी, रांची 
पाचवा कसोटी सामना : 7-11 जानेवारी, धर्मशाला