दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराचं केएल राहुलबाबत महत्त्वाचं वक्तव्य

वेस्टइंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा याने केएल राहुल बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Updated: Oct 7, 2020, 05:32 PM IST
दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराचं केएल राहुलबाबत महत्त्वाचं वक्तव्य title=

मुंबई : वेस्टइंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा याने केएल राहुल बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलं की, केएल राहुलला भारतीय संघात विकेटकीपिंगची जबाबदारी न देता त्याला त्याच्या बॅटींगवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी संधी दिली पाहिजे.

लारा म्हणतो की, 'ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील एक वर्षात परिपक्व झाला आहे. भारताच्या नंबर एक विकेटकीपर बॅट्समन म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे.'

राहुलने आस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये आणि न्यूझीलंड दौऱ्यात विकेटकीपर म्हणून चांगली कामगिरी केली होती. भारतीय टीमने राहुलच्या बॅटींग क्रमबाबत ही प्रयोग करुन पाहिला. ज्यात तो यशस्वी झाला.

लाराने म्हटलं की, 'सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छितो की, विकेटकीपिंगचा भार त्याच्यावर नाही दिला पाहिजे. तो एक चांगला बॅट्समन आहे. त्याने बॅटींगवर लक्ष्य केंद्रीत करुन मोठा स्कोर बनवला पाहिजे.'

केएल राहुलने आयपीएलमध्ये 5 सामन्यांमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यंत त्याने 302 रन केले आहेत.

पंतला महेंद्र सिंह धोनीचा उत्तराधिकारी मानले जाते. पण सुरुवातीला त्याला विकेटकीपिंगमध्ये काही चुकांमुळे टीका देखील सहन करावी लागली होती. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 171 रन केले आहेत. युवा क्रिकेटर एका वर्षात चांगली कामगिरी करत आहे. दिल्लीकडून खेळताना तो अधिक जबाबदारीने खेळत आहे.

संजू सॅमसनबाबत लाराने म्हटलं की, या 25 वर्षीय क्रिकेटरला अजून काही सुधार आणण्याची गरज आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून विकेटकीपिंग करत नाहीये. पण ती चांगली विकेटकीपिंग करु शकतो.  हे त्याचं मुख्य काम आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याने शारजाहमध्ये चांगला खेळ दाखवला आहे.'