जगातील सर्वात गोड नावानं ओळखली जाते हरभजनची लेक

हरभजन आणि त्याच्या पत्नीनं आपल्या दोन्ही मुलांसाठी फार उत्तम नावांची निवड केली आहे.

Updated: Dec 7, 2021, 04:18 PM IST
जगातील सर्वात गोड नावानं ओळखली जाते हरभजनची लेक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी क्रिकेटवटू हरभजन सिंह याच्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिला. हे हरभजन आणि त्याची पत्नी, गीता बसरा यांचं दुसरं अपत्य आहे. याआधी 2016 मध्ये त्यांच्या घरी एका गोड परीचं म्हणजेच मुलीचं आगमन झालं होतं. 

हरभजन आणि त्याच्या पत्नीनं आपल्या दोन्ही मुलांसाठी फार उत्तम नावांची निवड केली आहे.

2016 मध्येच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हरभजननं त्याच्या लेकीच्या नावाचा खुलासा केला होता. त्याच्या या पोस्टवर अनेकांनीच कमेंट करत त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. 

गीता आणि हरभजन यांनी त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं होतं, 'हिनाया हीर प्लाहा.' हे नाव सहसा ऐकायला तसं कमीच मिळतं. त्याचा अर्थही तितकाच रंजक आहे. 

'ह' या आद्याक्षरावरुन सुरु होणाऱ्या हिनाया या नावाचा अर्थ आहे, लकाकी, उज्वल, सुंदर आणि मनाला भावणारी एखादी गोष्ट. परी, असा या नावाचा आणखी एक अर्थ आहे. 

हरभजनच्या मुलीच्या नावातील हीरचा अर्थ हिरा किंवा एखादं रत्न असाही होतो. 

नावातच इतका सुंदर अर्थ दडलेली हरभजन आणि गीताची ही लेक त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा आपल्या भेटीला आली आहे.

आता तर, तिच्या नावाचा अर्थ कळल्यामुळे तिच्याबाबतचं कुतूहल आणखी वाढलं असणार यात वाद नाही.