टीम इंडियामध्ये खांदेपालट ; आफ्रिका दौऱ्यात वनडे टीमला मिळणार नवा कॅप्टन?

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे.  

Updated: Dec 7, 2021, 03:37 PM IST
टीम इंडियामध्ये खांदेपालट ; आफ्रिका दौऱ्यात वनडे टीमला मिळणार नवा कॅप्टन? title=

मुंबई : न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आफ्रिका विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेक मोठे बदल होणार असल्याची शक्यता आहे. (india tour of south africa 2021 22  rohit sharma might be taking charges of odi team captaincy after virat kohli says report)

टीम इंडियाला टी 20 नंतर वनडेमध्ये नवा कर्णधार मिळणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बीसीसीआय (BCCI) नियमित कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) संवाद साधणार आहे. 

  
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माला (Rohit Sharma) टी 20 नंतर आता आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत वनडे टीमच्या कॅप्टन्सची जबाबदार मिळणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही, तर केएल राहुलला (K L Rahul) टी 20 नंतर एकदिवसीय संघांचं उपकर्णधारपद मिळू शकतं. 

 

रोहित यशस्वी कर्णधार 

रोहितने याआधी अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची जबाबदारी सांभाळली आहे. रोहितला कर्णधारपदाचा पर्याप्त आणि पुरेपुर अनुभव आहे.

आयपीएलमध्ये रोहित गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या सातत्याने कर्णधारपद सांभाळतोय. त्यामुळे रोहितला टी 20 नंतर वनडेची जबाबदारी मिळाल्यावर तो कसा खेळतो, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.   

जबाबदारीतून मुक्त झाल्यावर विराटची कामगिरी बहरणार? 

दरम्यान विराटला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून होऊन त्याने बॅटिंगवर लक्ष केंद्रित करावं, अशी इच्छा बीसीसीआयची आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सूत्राने दिली आहे. 

विराटला गेल्या काही काळात आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 2 वर्षांआधी झळकावलं होतं. त्यामुळे विराट वनडे कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याच्या कामगिरीत बहर येणार का, याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. 

विराटसेनेसाठी कसोटी मालिका महत्तवपूर्ण

टीम इंडियाला आतापर्यंत आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे कसोटी कर्णधार विराट आणि हेड कोच राहुल द्रविडसमोर टीम इंडियाला या मालिकेत विजय मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे.  

आगामी वर्ष टीम इंडियासाठी महत्त्वाचं

टीम इंडियासाठी आगामी काही वर्षं ही अतिशय महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियात नववर्षात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. 

तर  यानंतर 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे या दोन्ही स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघाची मोट बांधण्यासाठी पर्याप्त वेळ आहे. 

असा आहे आफ्रिका दौरा  

टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर दौऱ्यांची सांगता ही 23 जानेवारीला होणार आहे. दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेरपासून होणार आहे. 

टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्यात प्रत्येकी 3 सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. 

साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

असं आहे वेळापत्रक

कसोटी मालिका 

पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  

दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  
  
तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.  

वनडे सीरिज 

पहिली वनडे, 19 जानेवारी 2022, पार्ल.

दुसरी वनडे, 21 जानेवारी 2022, पार्ल.

तिसरी वनडे, 23 जानेवारी 2022,  केपटाऊन.

कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेची घोषणा

दरम्यान साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. एकूण 21 सदस्यीय संघ आहे.  

अशी आफ्रिकन टीम : डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.