या क्रिकेटपटूने मैदानातच भुकेल्या चिमुकल्याला खायला दिलं

क्रिकेटपटूने उपाशी मुलाला  खायला दिलं 

Updated: Jan 15, 2020, 10:33 AM IST
या क्रिकेटपटूने मैदानातच भुकेल्या चिमुकल्याला खायला दिलं

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू इकबाल अब्दुल्ला सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर अब्दुल्लाचे फोटो व्हायरल होत आहेत. डावखुरा स्पिनर असलेला इकबाल अब्दुल्ला सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सिक्कीमकडून खेळत आहे. इकबाल अब्दुल्लाने मैदानातच एका भुकेल्या मुलाला खायला दिलं तसंच त्याला चहादेखील पाजला. हे फोटो इकबालने ट्विटरवर शेयर केले आहेत. या फोटोंवर कमेंट करताना यूजर्सने इकबालचं कौतुक केलं आहे.

सराव सुरु असताना इकबालची नजर भुकेल्या मुलाकडे गेली. इकबालने या मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला खायला दिलं. जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो, तेव्हाच देव आपल्याला काहीतरी देतो, असं कॅप्शन इकबालने या फोटोंना दिलं आहे.

डावखुरा स्पिनर असलेला इकबाल मधल्या फळीतला उपयुक्त बॅट्समनही आहे. इकबाल अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीममध्ये होता. भारतीय टीमकडून खेळण्याचं इकबालचं स्वप्न आहे. आयपीएलमध्येही इकबाल अब्दुल्ला खेळला आहे. इकबालने ६३ प्रथम श्रेणी मॅचच्या ८३ इनिंगमध्ये २,३१८ रन केल्या आहेत. १५९ नाबाद हा इकबालचा सर्वोत्तम स्कोअर आहे. इकबालने ६३ प्रथम श्रेणी मॅचच्या १०५ इनिंगमध्ये १८६ विकेट घेतल्या आहेत.