पाक क्रिकेटरने शेअर केला द्रविडसोबतचा सेल्फी

क्रिकेटच्या दुनियेत द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा क्रिकेटर राहुल द्रविडचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. 

Updated: Dec 31, 2017, 03:43 PM IST
पाक क्रिकेटरने शेअर केला द्रविडसोबतचा सेल्फी

नवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेत द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा क्रिकेटर राहुल द्रविडचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. 

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानातही द्रविडचे चाहते काही कमी नाहीत. पाकिस्तानच्या एका खेळाडूने द्रविडसोबतचा एक फोटो सध्या शेअर केलाय. पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद हाफीजने शुक्रवारी माजी कर्णधार राहुल द्रविडसोबतचा एक सेल्फी शेअर केलाय. हफीज न्यूझीलंडला जात असताना फ्लाईटमध्ये त्याची भेट राहुल द्रविडशी झाली.

यावेळी त्याने मोहम्मद हाफीजने द्रविडसोबत सेल्फी घेतला आणि ट्विटरवर पोस्ट केला. त्याने हा फोटो पोस्ट करताना म्हटले, क्रिकेटमध्ये 'द वॉल' या नावाने ओळखणाऱ्या व्यक्तीला मी भेटलो. राहुल द्रविड शानदार व्यक्ती आहेत. ते नेहमीच क्रिकेटबद्दल बोलत असतात तसेच नेहमी मदतीसाठी तयार असतात. मला गर्व आहे की मैदानावर मला त्यांच्यासोबत खेळता आले. त्यांना भेटून खूप आनंद झाला. ते नेहमी आनंदी राहोत. 

हफीज आणि द्रविडची भेट फ्लाईटमध्ये झाली. द्रविड अंडर १९ वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडला जात असताना त्याची भेट हफीजशी झाली. अंडर १९चा वर्ल्डकप न्यूझीलंडला होतोय.