या भारतीय क्रिकेटरने हवेत केले गर्लफ्रेंडला प्रपोज, सोशल मीडियावर व्हायरल

क्रिकेटच्या जगात सध्या टीम इंडियाचा बोलबाला आहे. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर स्थानिक क्रिकेट आणि लहानसहान स्पर्धांमध्येही भारतीय क्रिकेटर नवनवे रेकॉर्ड करतायत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 31, 2017, 11:36 AM IST
या भारतीय क्रिकेटरने हवेत केले गर्लफ्रेंडला प्रपोज, सोशल मीडियावर व्हायरल title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगात सध्या टीम इंडियाचा बोलबाला आहे. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर स्थानिक क्रिकेट आणि लहानसहान स्पर्धांमध्येही भारतीय क्रिकेटर नवनवे रेकॉर्ड करतायत. 

सध्या रणजी स्पर्धेची फायनल सुरु आहेत. दिल्ली आणि विदर्भ या दोन संघांमध्ये रणजीचा अंतिम सामना रंगतोय. या स्पर्धेतून जरी कर्नाटक संघ बाहेर गेला असला तरी त्यांचा सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल यांची चांगलीच चर्चा झाली. आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मयांकने प्रेमाच्या दुनियेतही बाजी मारली आहे.

हटके स्टाईलमध्ये केले प्रपोज

मयांक या सीझनचा हिरो ठरलाय.मयांकने या सीझनध्ये सर्वाधिक ११६० धावा ठोकल्या. हे वर्ष आणि नोव्हेंबर महिना त्याच्यासाठी खास ठरलाय. त्यानंतर डिसेंबर महिना त्याच्यासाठी खास प्रेमाचा ठरलाय. 

२६ वर्षीय मयांकने खास शैलीत आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. शनिवारी मयांकने इन्स्टाग्राम पेजवर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा फोटो शेअऱ केलाय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मयांकने लंडन आय येथे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. शनिवारी त्याने हा फोटो चाहत्यांसाठी शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला, ती मला हो म्हणालीये. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाहीये. आमच्या दोघांसाठी हा क्षण नेहमीच ताजातवाना राहील.