सचिन तेंडुलकरनंतर आता 'जर्सी नंबर १०' देखील होणार रिटायर्ड ?

क्रिकेट विश्वामध्ये 'जर्सी नंबर १०' आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण अगदी पक्क आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील करिअर हे २४ वर्षांचे आहे. 

Updated: Nov 29, 2017, 01:29 PM IST
सचिन तेंडुलकरनंतर आता 'जर्सी नंबर १०' देखील होणार रिटायर्ड ? title=

  मुंबई : क्रिकेट विश्वामध्ये 'जर्सी नंबर १०' आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण अगदी पक्क आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील करिअर हे २४ वर्षांचे आहे. 

 

 अनौपचारिक रिटायरमेंट  

 10 मार्च 2012 रोजी पाकिस्तान विरूद्ध मॅच खेळताना सचिनने १० नंबरची जर्सी शेवटची घातली होती. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी १० नंबरची जर्सी घालणं कटाक्षानं टाळलं होतं.. हा खेळाडूंनी पाळलेला अलिखित नियम होता. 
 

 शार्दुल ठाकूर आणि जर्सी नंबर १० 

 
 २०१७ मध्ये शार्दुल ठाकूर या खेळाडूने वन डे मॅचमध्ये पदार्पण करताना १० नंबरची जर्सी घातली होती. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी टीका केली होती. शार्दुलने न्युमरोलॉजीच्या गणितानुसार १० नंबर निवडला होता.मात्र त्याच्यावर टीका झाली. 
 
 शार्दुल त्यानंतर ५४ क्रमांकाच्या जर्सीमध्ये दिसला होता. 
 

 बीसीसीआयचा निर्णय   

 क्रिकेट आणि सचिनच्या चाहत्यांना १० नंबर हा केवळ सचिनशी निगडीत रहावा अशी आशा आहे. बीसीसीआयदेखील या प्रकारणी वाद टाळावा या भूमिकेत आहेत. परिणामी भविष्यात इंटरनॅशनल स्तरावर १० नंबर खेळाडूंना निवडता येणार नाही . अशी भूमिका घेण्याच्या विचारात असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकार्‍याने एका वृत्तपत्रकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.