'या' भारतीय खेळाडूचं लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत लग्न

मुंबईत अतिशय खासगी सोहळा

Updated: Jul 17, 2021, 06:47 AM IST
'या' भारतीय खेळाडूचं लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत लग्न  title=

मुंबई : भारतीय ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) बोहल्यावर चढला आहे. त्याने आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड अंजुम खान (Anjum Khan) ने मुंबईत (Mumbai) एका खासगी सोहळ्याच्या रुपात लग्न केलं आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. (Cricketer Shivam Dube married to his long time girlfriend Anjum Khan in Mumbai ) 

एकमेकांसाठी शिवम-अंजुम 

शिवम दुबे (Shivam Dube) ने ट्विटरवर (Twitter) वर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 'मी प्रेमावर प्रेम केलं. जे प्रेमापेक्षा ही अधिक आहे. आता आमचं आयुष्य सुरू होत आहे. जस्ट मॅरिड 16-07-2021'

लग्नानंतर मागितला आशिर्वाद 

भारतीय क्रिकेटर शिवम दुबे (Shivam Dube) पत्नी अंजुम खान (Anjum Khan) हिला अंगठी घातली आहे. लग्न पूर्ण झाल्यानंतर नववधु आणि नवरदेव यांना आशिर्वाद दिला. गळ्यात वरमाळा घालून कपल अतिशय क्यूट दिसत आहेत. 

लग्नानंतर IPL मध्ये दिसणार शिवम 

मुंबईकडून रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळणारा शिवम दुबे (Shivam Dube) आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ची टीम आरसीबी (RCB) सोबत जोडला गेला आहे. आता लग्नानंतर तो यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये दिसणार आहे.