Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?

Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.

Updated: Jan 7, 2023, 06:44 PM IST
Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार? title=
Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez: काही काळापूर्वी स्टार फुटबॉलर रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लब सोडला होता. युरोपियन क्लब सोडून रोनाल्डो आता सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून (Al Nassr) खेळणार आहे. रोनाल्डो आणि अल नासर क्लबमध्ये अडीच वर्षांसाठी करार (Cristiano Ronaldo playing for Al Nassr) झालाय. त्यासाठी आता रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) पोहोचला आहे. त्यानंतर आता रोनाल्डोच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (cristiano ronaldo and georgina rodriguez set to break saudi arabia law by living together marathi news)

जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात. हे जोडपं सध्या सौदी अरेबियामध्ये आहे. सौदी कायद्यानुसार (saudi arabia law) लग्न न करता जोडप्याने एकाच घरात राहणे बेकायदेशीर आहे.

सौदी अरेबियाच्या नियमांनुसार, जर लग्नाशिवाय कोणीही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड (girlfriend boyfriend) एकाच घरात राहू शकत नाहीत, तर मग दोघांना शिक्षा होणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. त्यावर आता अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट समोर आलंय. रोनाल्डोला त्याच्या विशेष दर्जामुळे सौदीतील नियम (ronaldo and georgina set to break saudi arabia law) मोडल्यावरही शिक्षा होणार नाही, असं सांगण्यात येतंय.

आणखी वाचा - Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

दरम्यान, कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup) देखील कतारच्या जाचक नियमांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. फुलबॉलचा बादशाह अशी ओळख मिळालेल्या रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) फुटबॉलच्या फायनलपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळे चाहते देखील दु:खी आहेत. त्यानंतर आता क्लबमध्ये रोनाल्डो चांगलं प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.