close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वर्ल्डकप हरल्यानंतर रोनाल्डोची हॉटेल स्टाफला इतक्या लाखांची टीप

याची चर्चा केवळ ग्रीसमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात होतेयं. 

Updated: Jul 20, 2018, 11:21 AM IST
वर्ल्डकप हरल्यानंतर रोनाल्डोची हॉटेल स्टाफला इतक्या लाखांची टीप

नवी दिल्ली : मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या अंदाजात पैसे खर्च करताना दिसतात. कधी स्वत:साठी तर कधी इतरांवर पैसे खर्च करताना आपण त्यांना पाहतो. पोर्तुगाल फुटबॉल टीमचा कॅप्टन आणि नंबर १ फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील श्रीमंत खेळाडुंपैकी आहे. फिफा वर्ल्डकप २०१८ च्या क्वार्टर फायनलमधून टीम बाहेर पडल्यानंतर फॅमिलीसोबत तो सुट्टी एंजॉय करायला गेला. या स्टार खेळाडूने दिलेली टीप पाहून उपस्थितांची बोट तोंडात जाण्याची वेळ आली.

स्टाफवर खूश

रोनाल्डोने ग्रीसमध्ये ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं तिथून निघताना हॉटेल स्टाफसाठी १७,८५० पाऊंड म्हणजेच १५ लाख ९९ हजार ९३१ रुपये टीप म्हणून दिले. याची चर्चा केवळ ग्रीसमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात होतेयं.  दरम्यान जुवेंट्स फुटबॉल क्लसोबत त्याची १०० मिलियन यूरोची डील फायनल झालीय.  रोनाल्डो या हॉटेल स्टाफच्या कामावर इतका खूश झाला की निघताना मोठ्या रकमेचा चेकच देऊन टाकला.

 

Lovely moments

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

शानदार हॉटेल

ग्रीसमध्ये तो आपला परिवार आणि गर्लफ्रेंडसोबत अलिशान अशा कोस्टा नवारीने मेडिटेरेनियन किनाऱ्याजवळील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. याठिकाणच्या रिसॉर्टमध्ये राहण्याच्या जागेसोबतच हेल्थ क्लब, शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्पा सारख्या सुविधा आहेत.