स्वप्न दाखवून केला चुराडा; पाकिस्तान संघाला मोठा धक्का

काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीत.

Updated: Nov 11, 2021, 12:13 PM IST
स्वप्न दाखवून केला चुराडा; पाकिस्तान संघाला मोठा धक्का title=

मुंबई : तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया टीम पाकिस्तानचा दौरा करणार होती. या दौऱ्याची घोषणाही करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासांतच पाकिस्तानला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीत. 

संघातील काही खेळाडूंना पाकिस्तानच्या जाण्याबाबत तज्ज्ञांचं मत घ्यायचं आहे, तर काही खेळाडू लवकरच निर्णय घेतील. मात्र खरं सांगायचं तर काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीत, असं पेनने सांगितलं आहे. 

पेन म्हणाला, 'यापूर्वी इतर देशांच्या दौऱ्यांवरही असं घडलं आहे. या दौऱ्याबाबतही काही अडचणी असतील, त्या नक्कीच पुढे होतील. याबाबच आम्ही चर्चा करू. खेळाडूंच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. शेवटी, ते काय निर्णय घेतात हे खेळाडूंवर अवलंबून असेल."

टीम पेनने खुलासा केला की, "जेव्हा ते 2017 मध्ये पाकिस्तानला गेले होते, तेव्हा त्या दौऱ्यावर त्यांच्याकडे असलेली सुरक्षा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. त्यांच्याकडे हेलिकॉप्टर होतं, चार-पाच किलोमीटरचे रस्ते बंद होते."

ग्लेन मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीये. मॅक्सवेल लग्नबंधनात अडकणार आहे. 2020मध्ये त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला होता. कोरोनामुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं आहे.