दुबई : आयपीएलची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत अधिकवेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केलेली मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर या लोकप्रिय टीममध्ये यावर्षी अनेक बदल पहायला मिळालेत.
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात ईशान किशन या खेळाडूला पुन्हा टीममध्ये संधी दिली. दरम्यान ईशान किशनला ओपनर आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या जागी टीममध्ये सामील केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा डी कॉक यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईल याने सांगितलं की, ईशानने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात चांगला खेळ केला. एक ओपनर म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलं असल्याने त्याने त्याची जागा पक्की केली आहे.
कुल्टर नाईल पुढे म्हणाला, मला असे वाटतं की, ईशानचं कमबॅक खरोखर चांगलं होतं. विशेषत: काही सामने न खेळ्यानंतर. ईशानला खेळताना पाहून मला खरोखर आनंद झाला. आता तो फॉर्ममध्ये परतला आहे. पुढे जाऊन या फॉर्मला पुढे घेऊन जाऊ शकतो.
मला वाटतं की ईशानने ओपनर म्हणून फलंदाजी करणं त्याच्यासाठी चांगलं आहे. त्याला त्याचे शॉर्ट्स खेळायला आवडतात. क्विंटन डी कॉक बाहेर पडल्याने तो अव्वल स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. त्यांनी बहुधा हे त्याचं स्थान पक्कं केलं, असल्याचंही कुल्टर नाईल म्हणालाय.