Dale Steyn On Rohit Sharma : वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) आता फक्त काही तास बाकी आहेत. उद्या डिफेन्डिंग फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्घ 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया मैदानात कसून सराव करताना दिसते. अशातच आता साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज स्टेनगन म्हणजे डेल स्टेन (Dale Steyn) याने कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) वॉर्निंग दिली आहे.
रोहित शर्मा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चांगली खेळी करताना दिसतो. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाला सेमीफायनल गाठता आली होती. रोहित शर्मा फास्टर बॉलर्सचा चोप देतोच, त्याचबरोबर स्पिनर्सला देखील सुट्टी देत नाही. मात्र, रोहित शर्माची विकनेस म्हणजे लेफ्ट हँडर फास्टर बॉलर... शाहीन शाह आफ्रिदी, ट्रेंड बोल्ड, मोहम्मद आमीर, मिचर स्टार्क यांसारख्य़ा गोलंदाजांविरोधात रोहित शर्मा नेहमी अडखळलेला दिसतो. अशातच आता डेल स्टेनने रोहित शर्माने हिंट दिली आहे.
शाहीन शाहविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाज नेहमी अडखळतात. रोहित शर्माची परिस्थिती देखील तीच आहे. त्यामुळे रोहितने खेळताना फक्त त्याच्या पॅडवर नजर ठेवावी, असं डेल स्टेन म्हणाला आहे. डेल स्टेन याने त्याच्या पाच घातक गोलंदाजाची निवड केली होती. यामध्ये मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, मार्क वुड आणि शाहीन शाह आफ्रिदी या गोलंदाजांचा समावेश होता.
PAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...
पाहा पहिल्या सामन्यासाठी टीम
इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेव्हिड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.
न्यूझीलंड : केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, विल यंग.