close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईची तुफानी बॅटिंग, दिल्लीला विजयासाठी इतक्या रन्सची आवश्यकता

दिल्ली विरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये मुंबईच्या टीमने सुरुवातीपासूनच धडाकेबाज बॅटिंग केली. मुंबईच्या बॅट्समनने चांगली बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १९४ रन्स केले. त्यामुळे आता दिल्लीच्या टीमला विजयासाठी १९५ रन्सची आवश्यकता आहे.

Updated: Apr 14, 2018, 05:48 PM IST
मुंबईची तुफानी बॅटिंग, दिल्लीला विजयासाठी इतक्या रन्सची आवश्यकता
File Photo

मुंबई : दिल्ली विरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये मुंबईच्या टीमने सुरुवातीपासूनच धडाकेबाज बॅटिंग केली. मुंबईच्या बॅट्समनने चांगली बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १९४ रन्स केले. त्यामुळे आता दिल्लीच्या टीमला विजयासाठी १९५ रन्सची आवश्यकता आहे.

मुंबईच्या टीमकडून सूर्यकुमार यादवने ३२ बॉल्समध्ये ५३ रन्स, एव्हीन लुईस २८ बॉल्समध्ये ४८ रन्स, इशान किशनने २३ बॉल्समध्ये ४४ रन्स, रोहित शर्माने १५ बॉल्समध्ये १८ रन्स, कृणाला पांड्याने ११ रन्स केले. अशा प्रकारे मुंबईच्या टीमने ७ विकेट्स गमावत १९४ रन्सपर्यंत मजल मारली.

दिल्लीच्या टीमकडून ट्रेंट बोल्ट, डेनिएल क्रिश्चियन आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले. तर, मोहम्मद शमीने एक विकेट घेतला.