मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात चांगली झालेली नाही. या सिझनमध्ये मुंबईला अजून एकाही विजयाची नोंद करता आलेली नाही. दरम्यान गेल्या पराभवाच्या छायेत असलेल्या मुंबईच्या टीमला चीअर करण्यासाठी सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर स्टेडियममध्ये आली होती. सारा तेंडुलकर आणि तिची आई अंजली तेंडुलकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलंही झाला होता.
या फोटोमध्ये सारा मुंबईच्या जर्सीमध्ये दिसून येतेय. त्या सामन्यापूर्वी साराची एक सोशल मीडिया पोस्टही चांगलीच व्हायरल झाली होती. अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यूबाबत ही पोस्ट होती. दरम्यान साराच्या स्टेडियममधील उपस्थितीनंतर तिचं नाव थेट बेबी एबीसोबत म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसशी जोडण्यात आलं.
यानंतर सोशल मीडियावर डेवाल्ड आणि सारा तेंडुलकरच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, बेबी एबी सारा तेंडुलकरच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं आहे. यानंतर या दोघांच्याही नावाच्या चर्चांना फार उधाण आलं.
Ab! Ye kya aaya.. pic.twitter.com/sEnYYgEhtI
— RVCJ Media (@RVCJ_FB) April 19, 2022
दरम्यान याची कोणत्याही प्रकारची खात्री पटलेली नाही. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचं नाव हे ग्लॅमरस आणि लोकप्रिय नावांपैकी एक आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून तिचं बऱ्याचदा नाव चर्चेत आलं आहे.
रिलेशनशिपमध्ये आहे बेबी एबी
तर दुसरीकडे डेवाल्ड रिलेशनशिपमध्ये असल्याचंही समोर आलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिंडी मारी असं आहे. लिंडी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह असते. यावेळी तिने अनेकदा बॉयफ्रेंड डेवाल्डसोबतचे फोटो शेअर केले आहेत.