कॅप्टन कूल धोनीबाबत युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा म्हणते...

युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्माने कॅप्टन कूल धोनीसाठी दिलेल्या उत्तरानं चाहते आणि क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं

Updated: Jun 17, 2021, 07:27 AM IST
कॅप्टन कूल धोनीबाबत युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा म्हणते...

मुंबई: सध्या युजवेंद्र चहल आणि कॅप्टन कूल धोनी आयपीएल स्थगित झाल्यामुळे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. युजवेंद्रची पत्नी धनश्री चहलला क्रिकेटमध्ये खूप आवड असल्याचं वेळोवेळी दिसतं. इन्स्टाग्रामवर धनश्री चाहत्यांसोबत संवाद साधत असताना तिला महेंद्रसिंह धोनीबद्दल चाहत्यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर धनश्रीने दिलेल्या उत्तरानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

धनश्री वर्मा आरसीबीकडून कायम चिअर्स करताना स्टेडियममध्ये दिसत असते. धनश्री वर्माने कॅप्टन कूल धोनीबाबत मन जिंकणारं उत्तर दिल्यानं चाहते देखील आनंदी आहेत. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी धनश्री वर्माला विचारलं की माही सरांबद्दल तुमचं मत सांगा. धनश्री म्हणाली, लेजेंड त्यांची रिुप्लेसमेंट होऊ शकत नाही. माही खूप नम्र आहे त्याचबरोबर अनेक लोकांचं प्रेरणास्त्रोत आहे. धनश्रीनं दिलेलं उत्तर चाहत्यांना आवडलं. 

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलनं डिसेंबर 2020 मध्ये विवाह केला होता. हनीमूनसाठी ते युएईला गेले होते त्यावेळी धोनीला भेटले होते. धनश्री वर्मा-युजवेंद्र सोबत त्यावेळी माहीने रात्री जेवण देखील केलं होतं. त्यावेळेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सध्या आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. युजवेंद्रची आतापर्यंतच्या 7 सामन्यात विशेष कामगिरी पाहायला मिळाली नाही. मात्र आता उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार आहेत.