युजवेंद्र चहलच्या पत्नीचा भन्नाट स्वॅग! बोल्ड अदांवर चाहते घायाळ

आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. युजवेंद्र पर्पल कॅपचा दावेदान मानला जात आहे.

Updated: May 3, 2022, 10:47 AM IST
युजवेंद्र चहलच्या पत्नीचा भन्नाट स्वॅग! बोल्ड अदांवर चाहते घायाळ title=

मुंबई : आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. युजवेंद्र पर्पल कॅपचा दावेदान मानला जात आहे. या स्पर्धेत आघाडीचं नाव त्याचं आहे. त्याच्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे. दुसरीकडे युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

कधी आपल्या अदा आणि बोल्ड लूकमुळे तर कधी डान्समुळे ती चाहत्यांची मनं जिंकून घेते. धनश्रीचे स्टेडियममधील व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्सही खूप जास्त आहेत. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री राजस्थान टीमला सपोर्ट करताना स्टेडियममध्ये दिसली आहे. कोलकाता विरुद्ध सामन्यात तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमध्ये ती पुन्हा चर्चेत आली. 

धनश्री वर्मा कोरियोग्राफर आहे. ती युट्यूब आणि इन्स्टावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे.