नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आम्रपाली ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. धोनी थेट या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. धोनीने याचिकेत म्हटलं आहे की, रांचीमध्ये आम्रपाली सफायरमध्ये त्याने पेंटहाउस बुक केलं होतं. तेव्हा आम्रपाली ग्रुप मॅनेजमेंटने दिशाभूल करत अनेक स्वप्न दाखवले होते. तसेच आम्रपाली ग्रुपने या प्रोजेक्टसाठी ब्रँडअँबेसडर देखील बनवलं.'
धोनीने कोर्टात फसवणुकीची तक्रार केली आहे. आम्रपाली ग्रुपने प्रमोशनचे पैसे न दिल्याचा धोनीचा आरोप आहे. धोनीने कंपनीवर ४० कोटी रुपये न दिल्याचा आरोप केला आहे. २००९ मध्ये धोनीने आम्रपाली समूहासाठी प्रमोशन सुरु केलं होतं. पण २०१६ मध्ये जेव्हा आम्रपाली कंपनीवर फसवणुकीचे आरोप होऊ लागले तर धोनीने स्वतःला या ग्रुपपासून वेगळं केलं होतं.
आम्रपाली कंपनीवर आरोप आहेत की त्यांनी ४६ हजार खरेदीदारांना वेळेवर घर नाही दिले. त्यामुळे कोर्टाने कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आम्रपाली ग्रुपवर ३८.९५ कोटी रुपये आणि त्यावर व्य़ाज १६.९५ कोटी रुपयांची थकीत आहे. धोनीने या पैशांची मागणी केली आहे.