धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम, रोहित शर्माला मागे टाकत बनला पहिला कर्णधार

महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली आहे आणि एक क्रिकेटपटू म्हणून तो फक्त आयपीएलमध्येच खेळत आहे, 

Updated: Oct 16, 2021, 03:08 PM IST
धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम, रोहित शर्माला मागे टाकत बनला पहिला कर्णधार

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली आहे आणि एक क्रिकेटपटू म्हणून तो फक्त आयपीएलमध्येच खेळत आहे, पण त्याची रेकॉर्ड बनवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सीएसकेने (CSK) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 27 धावांनी पराभव केला आणि धोनीने टी-20 स्वरूपात कर्णधार म्हणून आठवे विजेतेपद पटकावले. (Dhoni win 8 trophy's in T20 cricket))

टी-20 फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर धोनीने आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद 2007 साली जिंकले होते. त्याचबरोबर त्याने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले, माहीने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 चे विजेतेपद पटकावले. यासह त्याने 2016 मध्ये आशिया चषक टी-20 चे विजेतेपदही पटकावले. म्हणजेच आतापर्यंत त्याने त्याच्या कर्णधारपदाखाली टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 8 जेतेपदे जिंकली आहेत आणि त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 7 जेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्माने आयपीएलचे जेतेपद 5 वेळा, आशिया चषक एक वेळा आणि एकदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक टी -20 विजेतेपद पटकावणारे 6 खेळाडू-

8 - एमएस धोनी

7 - रोहित शर्मा

5 - शोएब मलिक

4 - ड्वेन ब्राव्हो

4 - इम्रान नजीर

4 - मशरफी मुर्तझा