T-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी धोनीने आताच घेतली सूत्र हाती, कशी? पाहा Video

टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीने वर्ल्डकपसाठी तयारी केली सुरु...

Updated: Sep 24, 2021, 09:14 PM IST
T-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी धोनीने आताच घेतली सूत्र हाती, कशी? पाहा Video

मुंबई : आयपीएल 2020 चे उर्वरित सामने हे यूएईमध्ये होत आहेत. आजचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होत आहे. पण आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात टॉस आधी सुरु असलेली चर्चा ही वेगळी होती. वादळ आल्यामुळे टॉसला उशीर झाला. पण या दरम्यान धोनी विराटला काही तरी सांगण्यात व्यस्त होता. 

आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. धोनी या वर्ल्डकपला टीम इंडियाचा मेंटॉर असणार आहे. तर विराट कोहली हा या आयपीएलनंतर कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न दोघांचा असणार आहे. पण याची सुरुवात आजपासूनच झाल्याचं चित्र मैदानावर दिसत होतं.

टी-20 वर्ल्डकप हा यूएईमध्येच रंगणार आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीचा आताच आढावा घेतला जात आहे. धोनी विराट कोहलीला काहीतरी सांगत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने पहिला टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप आणि 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.