MS Dhoni : राजस्थानसमोर 'धोनी रिव्ह्यू सिस्टम' फेल; फजिती पाहून जयस्वालचं हसू थांबेना...!

राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. मात्र या सामन्यात धोनीने एक घेतलेला रिव्ह्यू चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. 

Updated: Apr 28, 2023, 06:54 PM IST
MS Dhoni : राजस्थानसमोर 'धोनी रिव्ह्यू सिस्टम' फेल; फजिती पाहून जयस्वालचं हसू थांबेना...! title=

MS Dhoni : गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थानची टीम पुन्हा एकदा चेन्नईवर भारी पडताना दिसली. संजू सॅमसनने (Sanju Samson) पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राजस्थानसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. मात्र या सामन्यात धोनीने एक घेतलेला रिव्ह्यू चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. 

गुरुवारी झालेल्या सामन्यात तीक्षणा गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने टाकलेला बॉल हा यशस्वीच्या थेट पॅडवर जाऊन लागला. हा बॉल पाहून धोनीने क्षणाचाही विलंब न करतो मोठ्या दिमाखात रिव्ह्यू मागितला. मात्र धोनी अंदाज यावेळी पूर्णपणे चुकला, कारण अंपायरने त्यांचा निर्णय बदलला नाही. यावेळी जयस्वाल नॉट आऊट राहिला. मात्र धोनीचा रिव्ह्यू चुकल्याने यशस्वी स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही. जयस्वालच्या या रिएक्शनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

धोनीचा अंदाज फेल

महीश तीक्षणाचा तो बॉल जयस्वालला कळला नाही. यावेळी स्वीप करण्याचा नादात हा बॉल जयस्वालच्या पॅडवर जाऊन लागला. धोनीने रिव्ह्यू मागितल्यानंतर, त्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, बॉल बाहेरील लेग-स्टंपवर लागल्यामुळे फलंदाजाला नॉट आऊटचा करार देण्यात आला. यावेळी रिव्ह्यू फेल गेल्यामुळे धोनीची फजिती झाली आणि जयस्वालला हसू थांबवता आलं नाही. 

चेन्नईचा बदला राहिला अपूर्ण

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 203 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जयस्वालने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. त्याने 26 बॉल्समध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सहावं अर्धशतक पूर्ण केलं. राजस्थानच्या टीमने चेन्नईसमोर 203 रन्सचं टारगेट ठेवलं होतं. 

दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. या सामन्यात मराठमोळ्या ऋुतुराजने 47 रन्सची कामगिरी केली. तर शिवम दुबेने 33 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. दुसरीकडे मोईन अलीने देखीस मोठे फटके खेळले, मात्र टीमला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं.