Arjun Tendulkar : अहमदाबाद स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये मंगळवारी सामना रंगला होता. या सामन्या दरम्यान अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे.
गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना मुंबई इंडियन्सने गमावला. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये अर्जुन नाकामध्ये एक बोट घालतो आणि तेच बोट तो तोंडात घातलाना दिसत होता. मात्र आता याचं सत्य समोर आलं असून हा व्हिडीओ फसवा असल्याचं पुढे आलंय.
मुळात व्हायरल झालेला हा व्हिडीओ रिव्हर्स करण्यात आला आहे. म्हणजेच ओरिजनल व्हिडीओ हा शेवटापासून सुरु होतोय. याचाच अर्थ अर्जुनने नाकातील बोट तोंडात घातलेलं नाही. हा व्हिडीओ फसवा असल्याचं समोर आलंय.
यंदाच्या आयपीएलमध्ये गेल्या 2 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा अखेर डेब्यू झाला. यानंतर हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट घेतली. आतापर्यंत अर्जुनने आयपीएलमध्ये 4 सामने खेळले असून त्याने 3 विकेट्स घेतल्यात.
— Out_of_Context_Cricket (@OffbeatCricket_) April 26, 2023
पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने एक विकेट काढली होती. मात्र मुंबईच्या 16 व्या ओव्हरमध्ये अर्जुनने तब्बल 31 रन्स खर्च केले. यानंतर अर्जुनला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. मात्र पुढच्या सामन्यात अर्जुनने न खचता कमबॅक केलं आणि विकेट पटकावली.