धोनी-सेहवाग-गंभीर भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार?

२०११ साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे ३ खेळाडू आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 1, 2018, 05:07 PM IST
धोनी-सेहवाग-गंभीर भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार? title=

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी आगामी २०१९ची निवडणूक भाजपाकडून लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहेवाग यांची सध्याची विधान आणि ट्विट पाहता ते राजकारणात प्रवेश करत भाजपाकडून निवडणूक लढवू शकतात. मात्र महेंद्रसिंग धोनीचं नाव चर्चेत कसं आलं याबाबत त्याच्य निकटवर्तीयांनादेखील आश्चर्य वाटत आहे.

इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकामध्ये खेळण्याचं ध्येय धोनीनं ठेवलं आहे. संघ व्यवस्थापनालाही तो संघामध्ये हवा आहे. यामुळे तो अचानक निवडणूक कसा लढवेल अस प्रश्न उपस्थित केल जातोय. 

धोनीनं झारखंडमधून लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजपची धोनीसोबत बोलणी सुरु आहेत. द सनडे गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार गंभीरला दिल्लीतून उमेदवारी देण्यासाठी भाजप आग्रही आहे. मिनाक्षी लेखी यांच्याऐवजी गंभीरच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. लेखी यांच्या कामाबद्दल पक्षातलेच कार्यकर्त आणि त्यांच्या मतदारसंघातील नागरिक नाराज असल्याचंही बोललं जातंय.

गौतम गंभीर याचं सामाजिक कार्य आणि त्यानं आत्तापर्यंत लष्कराला केलेली मदत आणि लष्करासाठी घेतलेली भूमिका यामुळे गंभीरला सगळ्याच स्तरातून पाठिंबा मिळेल, असं भाजपला वाटतंय. या दोन्ही क्रिकेटपटूंच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.

धोनीनं २०१९ चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. तर गौतम गंभीरनंही अजून निवृत्ती जाहीर केलेली नाही. गंभीर २०१६ साली भारताकडून शेवटची मॅच खेळला आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये गंभीर चांगल्या फॉर्ममध्ये होता. फायनलमध्ये गंभीरच्या नेतृत्वात खेळलेल्या दिल्लीचा मुंबईकडून पराभव झाला.