मुंबई : फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले. या विजयासोबत चेन्नई सातव्यांदा फायनलमध्ये पोहोचली. डू प्लेसिसने नाबाद ६७ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. हैदराबादने विजयासाठी ठेवलेल्या १४० धावांचा पाठलाग करताना चेन्नईने ११३ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. मात्र प्लेसिसने १८व्या शतकात २० आणि १९व्या शतकांत १७ धावा करताना चेन्नईला विजयासमीप पोहोचवले. त्यानंतर २०व्या शतकांतील पहिल्या चेंडूवर षटकार मारत चेन्नईला दोन विकेटनी विजय मिळवला.
आयपीएलमध्ये दोन वर्षाच्या बंदीनंतर स्पर्धेत पुनरागमन करणारा चेन्नईचा संघ सातव्यांदा आयपीएलमध्ये पोहोचलाय. चेन्नईने पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला दोन विकेटनी हरवत आयपीएलची फायनल गाठली. यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, गेल्या १० हंगामात आमच्या संघाने चांगली कामगिरी केलीये. याचे श्रेय ड्रेसिंग रुममधील वातावरणाला जाते.
दोन वेळा वर्ल्डकपचे जेतेपद जिंकणारा कर्णधार म्हणाला, हे खेळाडू आणि सहकारी स्टाफशिवाय शक्य नव्हते. वातावरण चांगले नसेल तर खेळाडू एका दिशेत चालू शकत नाही. मात्र आम्ही आमच्या खेळाडूंना एकाच दिशेत ठेवण्यात यशस्वी ठरलो.
धोनी म्हणाला, जर ड्रेसिंग रुमचे वातावरण ठीक नसेल तर मैदानावर चांगली कामगिरी करणे शक्य होत नाही. आम्ही खूप वर्षाच्या मेहनतीने ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळाडूंसाठी पोषक केलेय. येथे प्रत्येक खेळाडूच्या हिताचा विचार करुन त्याला प्रेरित केले जाते. हैदराबादच्या विजयानंतर ड्वायेन ब्रावोने ड्रेसिंग रुममध्ये डान्स करत जल्लोष व्यक्त केला.