Team India सांभाळण्यासाठी पांड्या सक्षम आहे का? DK म्हणतो "मला वाटत नाही की..."

Team India T20 Captain: रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना आराम दिल्यानंतर आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करतोय. त्यावर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला...

Updated: Nov 18, 2022, 11:31 PM IST
Team India सांभाळण्यासाठी पांड्या सक्षम आहे का? DK म्हणतो "मला वाटत नाही की..." title=
Dinesh Kartik Hardik Pandya

Dinesh Kartik On Hardik Pandya: टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनल स्पर्धेत दारूण पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियाचे नवे छावे न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताचं नेतृत्व करत आहे. टी-ट्वेंटी मालिकाचा पहिला (NZ vs IND 1st T20) सामना पावसात वाहून गेला. त्यानंतर आता टीम इंडियाचा फिनिशर आणि विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) मोठं वक्तव्य केलंय.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना आराम दिल्यानंतर आता हार्दिक पांड्या (Captain Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करतोय. मात्र, गुजरातला आयपीएल ट्रॉफी (IPL) जिंकवणारा हार्दिक टीम इंडियाच्या कॅप्टनसीसाठी सक्षम आहे का?, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता दिनेक कार्तिकने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला दिनेश कार्तिक?

हार्दिक पांड्या हा एक चांगला कर्णधार ठरू शकतो, कारण मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखतो. मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. तो चांगला कर्णधार आहे, असं डीके म्हणाला. मला वाटतं त्याला खेळाडूंची नाडी माहिती आहे. मला वाटत नाही की तो मैदानात वाईट निर्णय घेतो. नेहमी तो योग्य निर्णय घेताना दिसतो. सहानुभूती आणि आपल्या खेळाडूंचा वापर कसा करायचा, हे त्याला चांगलं जमतं, असंही डीके (Dinesh Kartik On Hardik Pandya) म्हणाला.

आणखी वाचा - T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी

दरम्यान, हार्दिक पांड्याकडे नेतृत्व (Indian Captain Hardik Pandya) करण्याची क्षमता आहे. तो मोक्याच्या क्षणी स्वत:च्या अंगावर जबाबदारी घेऊ शकतो. त्यामुळे तो अनेकदा गेमचेंजर देखील ठरलाय. हार्दिककडे ती क्षमता आणि तो चांगला कॅप्टन होऊ शकतो, असंही दिनेश कार्तिक म्हणाला आहे.