जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक

या दुखापतीतून बरे व्हायला तिला खूप अवधी लागला.

Updated: Jul 8, 2018, 07:57 PM IST
जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक title=

नवी दिल्ली: दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांची विश्रांती घेतलेली भारताची जिमनॅस्टपटू दीपा कर्माकरने रविवारी जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. तुर्कीच्या मर्सिन शहरात आज एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपचे आयोजन करण्यात आले होते. तिने वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये १४.१५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या पात्रता फेरीतही १३.४०० गुण मिळवत दीपा पहिल्या स्थानावर होती. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिली होती. तेव्हा थोड्याशा फरकाने तिचे पदक हुकल्याने भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला होता. रिओ ऑलिम्पिकनंतर दीपा जायबंदी होती. तिच्यावर सर्जरीसुद्धा झाली होती. राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत ती फीट होऊन पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण या दुखापतीतून बरे व्हायला तिला खूप अवधी लागला. मात्र, आज तिने दमदार कामगिरी करत आपण भविष्यातील स्पर्धांसाठी तंदरुस्त असल्याचे दाखवून दिले.