VIDEO: मुरली विजयला पाहून DK-DK घोषणाबाजी, LIVE सामन्यात त्याने लोकांना जोडले हात

दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांचा वाद जुना आहे. काय आहे हा वाद पाहा.

Updated: Jul 27, 2022, 08:47 PM IST
VIDEO: मुरली विजयला पाहून DK-DK घोषणाबाजी, LIVE सामन्यात त्याने लोकांना जोडले हात title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज मुरली विजय (Murali Vijay) टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र मुरली बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, परंतु बऱ्याच काळानंतर तो तामिळनाडू प्रीमियर लीगच्या 2022 मध्ये खेळताना मैदानावर दिसला. यावेळी त्याला उपस्थित प्रेक्षकांकडून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. 

तो फिल्डिंग करत असताना लोकांनी दिनेश कार्तिकच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुरली विजय समोर डीके डीकेच्या घोषणा देण्यात आल्या.

मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्यातील वाद जुना आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये वादाचे कारण म्हणजे दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता हिचे मुरली विजयसोबत अफेअर होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर डीकेने पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर मुरलीने कार्तिकची पत्नी निकितासोबत (Nikita) लग्न केले. ही गोष्ट आजही चाहत्यांना खटकते. त्यामुळे मुरली विजय आजही क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर असतो.
 
जेव्हा मुरली मैदानात लाइव्ह मॅचदरम्यान बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यानंतर प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) नावाने घोषणाबाजी करत त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुरली विजयने उपस्थितांना हात जोडून शांत राहण्याचे आवाहन केले. व्हायरल व्हिडिओमध्ये तसे दिसत आहे.

एक काळ असा होता जेव्हा मुरली विजयची तुलना सलामीवीर वीरेंद्र सेहवागशी केली जात होती, पण त्याची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. त्यामुळे तो आज संघाचा भाग नाही.

दुसरीकडे, जर आपण मुरली विजयच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने टीम इंडियासाठी 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 3982 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 शतके झळकली. त्याला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि तो काही विशेष दाखवू शकला नाही.