मुंबई : क्रिकेटर्स हे काही बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्यांचे देखील अनेक चाहाते आहेत. लोक त्यांना वेड्यासारखे प्रेम करतात. ते आयुष्यात काय करतात? कुठे जाता? हे जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं. एवढंच काय तर. या क्रिकेटर्सचं आयुष्य कसं होतं? त्यांच्या आयुष्याची सुरुवात आणि सध्याची परिस्थीती यामधील फरक देखील त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला आवडतो. सोशल मीडियावर सेलिब्रिटी नेहमीच ऍक्टिव्ह असतात. ते आपला फोटो व्हिडीओ नेहमीच अपलोड करतात आणि चाहत्यांशी कनेक्टेड राहातात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो एका क्रिकेटरच्या लहानपणीचा आहे. हा लहान मुलगा खुप गोंडस आणि निरागस दिसत आहे. त्याचा हा लहानपणीचा फोटो पाहून तुम्ही म्हणाल, "की कोणी विचार केला असेल की, हा मुलगा मोठा होऊल लाखो चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण करेल."
सोशल मीडियावर युजर्स एकमेकांना हा फोटो पाठवून तो क्रिकेटर कोण आहे हे ओळखायला सांगत आहेत. तुम्ही देखील हा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला तो कोणता क्रिकेटर आहे ते ओळखता येतंय का ते पाहा.
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंची सध्या भारतात सर्वाधिक लोकप्रियता आहे. लोक त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना सर्वत्र फॉलो करतात. एवढेच नाही तर चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटरची देवासारखी पूजा करतात. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही त्याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. क्रिकेटर्सचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
टीम इंडियाचा हा क्रिकेटर कोण आहे?
या व्हायरल फोटोतील क्रिकेटर दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.
रोहित शर्मा आता भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार झाला आहे. विराट कोहलीची जागा रोहितने घेतली आहे. आयपीएलमधील शानदार कर्णधारपदानंतर रोहितकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल जिंकले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु रोहित शर्मा कोणत्याही श्रीमंत कुटुंबातील नव्हता. रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा हे स्टोअरहाऊस या ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये केअरटेकर म्हणून काम करायचे. वडिलांच्या खर्चातून रोहितच्या अभ्यासाचे पैसे काही मार्गाने निघू शकत होते. पण आज हा क्रिकेटर देशाचा सर्वात मोठा क्रिकेटर आहे. टी-20 आणि वनडेनंतर आता रोहित कसोटी संघाचाही कर्णधार झाला आहे.