23 Ball मध्ये 118 धावा! AB de Villiers चा वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडूने मोडला

Fastest One Day Hundred Breaks AB de Villiers Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चेन्नईमध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा सामना खेळवला जात असतानाच त्याच दिवशी हा विक्रम साकारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2023, 10:41 AM IST
23 Ball मध्ये 118 धावा! AB de Villiers चा वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडूने मोडला title=
रविवारी झालेल्या सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावे केला

Fastest One Day Hundred Breaks AB de Villiers Record: वर्ल्डकप 2023 स्पर्धेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला सामना भारताने 52 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला. मात्र दुसरीकडे दक्षिण ऑस्ट्रेलियामधील फलंदाज जेक फ्रासेर मॅकगुर्कने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. मार्श कप स्पर्धेमध्ये खेळताना जेकने रविवारी झालेल्या टास्मानियाविरुद्धच्या समान्यात एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झलकावलं. जेकने केवळ 29 बॉलमध्ये शतक झळकावलं. जेकच्या या खेळीने त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए. बी. डिव्हिलिअर्सचा वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. डिव्हिलिअर्सने 31 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.  

118 धावा त्याने Six, Four ने काढल्या

टास्मानियाच्या संघाने 435 धावांचा डोंगर उभा केला. 9 विकेट्सच्या मोबदल्यात टास्मानियाने एवढी मोठी धावसंख्या गाठली. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. मात्र त्यांना 398 धावांपर्यंतच मजल मारता आली. अॅडलेडमधील रोल्टन ओव्हलच्या मैदानामध्ये दक्षिण आस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाला असला तरी जेक फ्रासेर मॅकगुर्कसाठी हा सामना अविस्मरणीय ठरला. जेकने आपल्या 38 चेंडूंच्या खेळीमध्ये तब्बल 125 धावा केल्या. त्याने या खेळीत 10 चौकार आमि 13 षटकार लगावले.

12 व्या ओव्हरमध्ये बाद झाला

जेक फ्रासेर मॅकगुर्कला बे वेबस्टर या फिरकी गोलंदाजाने सामन्यातील 12 व्या ओव्हरमध्ये बाद केलं. जेक फ्रासेर मॅकगुर्कने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. हे कोणत्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने 50 ओव्हरच्या सामन्यांमध्ये झळकावलेलं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.

क्षमता पूर्णपणे वापरत नाही असं वाटलं

"मी सकारात्मक विचाराने मैदानात उतरलो होतो. मी काही प्लॅन्स आणि खेळीसंदर्भातील धोरणं निश्चित केली होती. सुदैवाने त्याप्रमाणेच मला खेळता आलं. मी यापूर्वी अनेक 30 धावांपर्यंतच्या खेळी केल्या आहेत. मात्र मला चेंडू चांगला लांबपर्यंत टोलवता येत असूनही आपण आपली क्षमता पूर्णपणे वापरत नसल्याचं वाटलं आणि याचं मला फार आश्चर्य वाटत होतं," असं जेक फ्रासेर मॅकगुर्कने सामन्यानंतर म्हटलं.

विरोधी संघाच्या कर्णधारानेही केलं कौतुक

जेक फ्रासेर मॅकगुर्कचं हे प्रोफेश्नल क्रिकेटमधील पहिलं शतक ठरलं. "अशी खेळी या नंतर मी पुन्हा कधी पाहणार नाही असं वाटतं. मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वोत्तम फटकेबाजी होती. कही वेळा अशी खेळी करणाऱ्यांसमोर आपण काहीच करु शकत नाही," असं टास्मानियाचा कर्णधार जॉर्डन सिल्कने जेक फ्रासेर मॅकगुर्कचं कौतुक करताना म्हटलं. "खेळाडू म्हणून हे छान वाटत होतं. पण कर्णधार म्हणून हे फार त्रासदायक होतं," असंही जॉर्डनने जेकच्या खेळीबद्दल प्रतिक्रीया नोंदवताना म्हटलं.