साउथम्पटन : कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर आता टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिकेत (Eng vs Ind 1st T20I) आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेला 7 जुलैपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना साउथम्पटनमध्ये रात्री साडे दहा वाजता खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर इंग्लंडची धुरा जॉस बटलरच्या खांद्यावर असणार आहे. (eng vs ind 1st t20i england vs team india who will win first match playing eleven squad)
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 19 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 10 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 9 वेळा टीम इंडियावर मात केली आहे.
एका पराभवाचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यात आता टीम इंडिया इंग्लंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कस लागणार आहे. तसेच टी 20 सामन्यात भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
जॉस बटलर (कप्तान), मोइन अली, हैरी ब्रूक, सैम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, टाइमल मिल्स, मैथ्यू पार्किंसन, जेसन रॉय, फिल साल्ट, रीस टॉपली और डेविड विली.