एजबस्टन : उपकर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) 146 धावांच्या खेळीने टीम इंडियाला तारलं. पंतने निर्णायक क्षणी केलेल्या या खेळीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला. त्यामुळेच टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली. यामुळे इंग्लंड पाचव्या कसोटीत बॅकफुटवर गेली आहे. मात्र यानंतरही इंग्लंडचा माज उतरलेला नाहीये. (eng vs ind 5th rescedule test match england assistant coach paul collingwood says we will not fere anyone)
पहिल्या डावात टीम इंडियाने 416 धावा केल्या. मात्र याचा इंग्लंडला काडीमात्र फरक पडलेला नाही. उलट आम्ही घाबरलेलो नाहीत, असा दावा इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकाने केलाय.
पंत मैदानात आला तेव्हा टीम इंडियाची 5 बाद 98 अशी स्थिती होती. त्यानंतर पंतने रवींद्र जडेजासह शानदार भागीदारी करत शतकी खेळी केली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या दिवसाअखेर 7 बाद 338 धावा केल्या. पंतने 111 बॉलमध्ये 20 चौकार आणि 4 खणखणीत सिक्ससह 146 धावा केल्या.
"मला वाटत नाही की, आमच्यावर फार वेळ प्रेशर असेल. पण पंतने केलेल्या खेळीसाठी त्याला सॅल्युट करतो. जेव्हा तुम्ही जागतिक स्तरावरील खेळाडूं विरुद्ध खेळता तेव्हा खेळही त्याच पातळीचा होतो", असं पॉल कॉलिंगूवड म्हणाला. पंतच्या खेळीनंतर पॉलने ही प्रतिक्रिया दिली.
"आम्ही चौथ्या डावात विजयी आव्हानाचं पाठलाग करायला घाबरत नाही, हे आम्ही न्यूझीलंड विरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सिद्ध केलंय. आम्ही पारंपरिक पद्धतीने कसोटी खेळत नाहीये. आम्ही जास्तीत जास्त आक्रमक होऊन खेळण्यचा प्रयत्न करतोय. तसेच विकेट्स घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा रन रेट कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे", असं कॉलिंगवूडने स्पष्ट केलं.
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावात ऑल आऊट 416 धावा केल्या. टीम इंडियाकडून पंतने सर्वाधिक 146 धावा केल्या. ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने 104 रन्सची शतकी खेळी केली. तर शेवटच्या क्षणी कॅप्टन जस्प्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडवर हल्लाबोल करत एका ओव्हरमध्ये 35 धावा कुटल्या.
त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 60 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळ वाया गेला. दरम्यान इंग्लंड अजूनही 356 धावांनी पिछाडीवर आहे.