8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटवर बॉलरला मागावी लागली माफी, नेमकं काय प्रकरण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड 2 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरू आहे. या सीरिजच्या पहिल्याच दिवसाचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट्ससह न्यूझीलंड संघाने 246 धावा केल्या आहेत.

Updated: Jun 3, 2021, 12:37 PM IST
8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटवर बॉलरला मागावी लागली माफी, नेमकं काय प्रकरण title=

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड 2 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरू आहे. या सीरिजच्या पहिल्याच दिवसाचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट्ससह न्यूझीलंड संघाने 246 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली असली तर त्याला चाहत्यांकडून मात्र रोष पत्करावा लागला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटमुळे अडचणीत आला आणि त्याला या गोष्टीसाठी रितसर माफी मागावी लागली. 

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन कसोटीमध्ये डेब्यू करून पहिल्याच दिवस त्याने न्यूझीलंड संघातील 2 फलंदाजांना तंबुत धाडलं. 27 वर्षांच्या या खेळाडूने 2012 ते 2014 दरम्यान केलेल्या ट्वीटमुळे तो अडचणीत आला आहे. त्याला या ट्वीटसाठी जाहीर माफी मागावी लागली. रॉबिन्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यानंतर ट्वीटरवर या मुद्द्यावर वाद सुरू झाला. 

रॉबिन्सन म्हणाला की, 'मी केलेल्या कृतीबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि अशा प्रतिक्रिया देण्यास मला लाज वाटते. त्यावेळी मी अविवेकी आणि बेजबाबदार होतो आणि त्यावेळी माझी जी काही मनस्थिती होती त्य़ातून हा प्रकार घडला होता.' जेव्हा आपण आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना हे ट्वीट केलं असल्याचंही गोलंदाजाने सांगितलं. 

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात रॉबिन्सनने 50 धावा देऊन 2 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. रॉबिन्सनने 8 वर्षांपूर्वी केलेले ट्वीट जेव्हा पुन्हा व्हायरल झाले तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डनं देखील त्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.